शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News LIVE: रूपाली चाकणकर कोणत्याही क्षणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 19:52 IST

महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स...

20 Mar, 26 07:31 PM

महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा तत्काळ राजीनामा द्या, मुख्यमंत्र्यांचे चाकणकरांना आदेश

महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा तत्काळ राजीनामा द्या, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रूपाली चाकणकर यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

20 Mar, 26 06:09 PM

रूपाली चाकणकर कोणत्याही क्षणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता

रूपाली चाकणकर कोणत्याही क्षणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे

20 Mar, 26 05:28 PM

पॅनिक बुकिंग टाळा, गॅसचा साठा पुरेसा आहे; पेट्रोलियम मंत्रालयाकडून महत्त्वाची माहिती

 देशात एलपीजी सिलिंडरचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत असून ग्राहकांनी घाबरून आगाऊ बुकिंग करण्याची गरज नसल्याचे पेट्रोलियम मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. युद्धामुळे आंतरराष्ट्रीय परिस्थिती चिंताजनक असली तरी, भारतात गॅस वितरकांकडे साठा संपल्याची कोणतीही तक्रार नाही. आतापर्यंत ७,५०० ग्राहक एलपीजीवरून पीएनजीकडे वळले आहेत. याशिवाय, १८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी व्यावसायिक गॅससाठी आदेश जारी केले असून गेल्या आठवड्यात ११,३०० टन व्यावसायिक एलपीजीचा पुरवठा करण्यात आला आहे.

 

 

20 Mar, 26 05:01 PM

अशोक खरातचे आक्षेपार्ह व्हिडीओ बाहेर काढणारा नीरज जाधव सापडला

नाशिक येथील अशोक खरात प्रकरणातील व्हिडीओ बाहेर काढणाऱ्या नीरज जाधवला पोलिसांनी अटक केली. त्याने पीडित महिलांना व्हिडीओ पाठवून ब्लॅकमेल केले होते. तसेच पैशांची मागणी केली होती. या  प्रकरणी पोलिसांनी आज त्याला ताब्यात घेतले असून चौकशी करण्यात येणार आहे. 

20 Mar, 26 04:38 PM

बीडच्या केज, आष्टी तालुक्यातील भागात गारपीट.. डोंगर पट्ट्यात गारांचा खच.. झाडांना पानेच राहिली नाही..

बीड जिल्ह्यात कालपासून अवकाळीने कहर केला आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी वारा आणि गारांचा पाऊस. यामुळे फळबागा व शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.. बीड जिल्ह्यातील आष्टी, केज तालुक्यातील अनेक गावांमध्ये काल झालेल्या गारपिठीमुळे डोंगरदऱ्यामध्ये गारांचा खच पाहायला मिळत आहे.तब्बल दोन ते तीन इंच गारांचा खच पडल्याचे दिसून येत आहे. यांचे व्हिडिओ आता समोर आले आहेत.

20 Mar, 26 04:37 PM

सातारा : देसाईंच्या हाताला जखम; आरोप-प्रत्यारोपांचा भडका

 पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हाताला जखम झाली असून, जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड प्रक्रियेला गालबोट लागल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पालकमंत्री देसाई यांना भाजप कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या गोंधळात त्यांच्या डाव्या हाताला जखम झाली. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हाताला जखम झाली असून, जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड प्रक्रियेला गालबोट लागल्याची घटना समोर आली आहे.

20 Mar, 26 04:36 PM

रत्नागिरीत व्यावसायिक एलपीजी गॅसचा तुटवडा; छोट्या हॉटेल व्यवसायिकांचे हाल

रत्नागिरी जिल्ह्यात व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरचा तुटवडा गंभीर बनला आहे. याचा फटका थेट छोट्या हॉटेल व्यवसायिकांना बसत असून, गेल्या काही दिवसांपासून हॉटेल्सना अर्ध्या दिवसानंतर बंद ठेवण्याची वेळ येत आहे. आजही अनेकांकडे फक्त काही तास पुरेल एवढाच गॅस साठा शिल्लक आहे. शहरी भागात पर्यायी व्यवस्था करणे शक्य नसल्याने हॉटेल चालकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

20 Mar, 26 04:19 PM

...अन्यथा त्यांचा काळा इतिहास बाहेर काढावा लागेल; संजयकाका पाटील यांची टीका

भाजपात जाण्यासाठी जयंत पाटील यांनी किती वेळा उंबरे झिजवले, याचा साक्षीदार मी आहे अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नेते संजयकाका पाटील यांनी दावा केला आहे. जयंत पाटील भाजपात जाण्यासाठी आग्रही होते. त्यांचे राजकारण अडचणीत आणणारे असून त्यांनी आगीशी खेळू नये अन्यथा त्यांचा काळा इतिहास बाहेर काढावा लागेल असा इशाराही संजयकाकांनी दिला. 

20 Mar, 26 03:11 PM

जालना : आंबा बाग अवकाळी पावसाने उद्ध्वस्त ;लाखोंचे नुकसान;तात्काळ मदतीची मागणी

जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील देवपिंपळगाव येथे काल सायंकाळच्या सुमारास झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतीचे मोठे नुकसान केले आहे. या गारपिटीचा सर्वाधिक फटका फळबागांना बसला असून, एका शेतकऱ्याच्या तब्बल तीन एकर केसर आंबा बागेचे मोठे नुकसान झाले आहे.

गारांच्या तडाख्यामुळे झाडांवरील बहुतांश आंबे खाली पडले असून, उरलेल्या फळांनाही गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण बाग होत्याची नव्हती झाल्याचे चित्र परिसरात पाहायला मिळत आहे.

20 Mar, 26 03:04 PM

PM मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्र्याला जीवे मारण्याची धमकी; पोलिसांकडून तपास सुरू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात स्वतंत्र प्रभार असलेले केंद्रीय जयंत चौधरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. चौधरी यांच्या टीमकडून यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली. एका भारतीय मोबाईल क्रमांकावरून कॉल आला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. 

20 Mar, 26 01:17 PM

साताऱ्यात भाजपचे 'ऑपरेशन लोटस' यशस्वी

सातारा: जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत भाजपचे तोडफोडीचे राजकारण व 'ऑपरेशन लोटस' यशस्वी झाले. राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि शिंदेसेनेचे ३५ चे बहुमत असतानाही भाजपाच्या तोडफोडीच्या राजकारणाने त्यांचा पराभव झाला. 

सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष प्रिया शिंदे यांची आणि उपाध्यक्षपदी राजू भोसले यांची निवड झाली. विशेष म्हणजे प्रिया शिंदे या शिंदेसेनेचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी मिळाली आहे.

20 Mar, 26 12:41 PM

बीड: गारपिटीचा तडाखा; कलिंगड, आंबा व भाजीपाल्याचे मोठे नुकसान

बीड जिल्ह्यातील अनेक भागांना अवकाळी गारपिटीचा जोरदार तडाखा बसला आहे. लिंबागणेश परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे शेतातील कलिंगड, आंबा आणि भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पोखरी घाट येथील शेतकरी दादासाहेब खिल्लारे यांच्या कलिंगड पिकाला सर्वाधिक फटका बसला असून, ऐन बहरात आलेले पीक पूर्णपणे वाया गेले आहे.
 

20 Mar, 26 12:40 PM

साताऱ्यात राजकीय हालचाली; राष्ट्रवादी-शिवसेना लढणार एकत्र

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याचे वक्तव्य पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी जिल्हा परिषदेत आल्यानंतर केले आहे. या वक्तव्यामुळे भाजपला बाजूला ठेवून ही निवडणूक होणार असल्याची चर्चा साताऱ्यात रंगू लागली आहे.

20 Mar, 26 11:58 AM

"महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर फरार", राष्ट्रवादीच्याच नेत्याच्या पोस्टने खळबळ

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या अशोक खरात प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. रुपाली चाकणकर यांच्याविरोधात आता पक्षातीलच रुपाली पाटील ठोंबरे आक्रमक झाल्या आहेत. रुपाली पाटील ठोंबरे यांनी रुपाली चाकणकर या फरार झाल्या असल्याचा दावा केला आहे. 

20 Mar, 26 11:46 AM

धुळे जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट; पिकांचे नुकसान

संपूर्ण राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा इशारा देण्यात आलेला असताना, धुळे शहरासह जिल्ह्यातही अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. साक्री तालुका आणि शिंदखेडा तालुक्यात गारपीट झाल्याने काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे परिसरात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या असून वादळी वाऱ्यामुळे हातातोंडाशी आलेली पिके आडवी पडली आहेत.

20 Mar, 26 11:27 AM

रुपाली चाकणकरांची नार्को टेस्ट झाली पाहिजे - अंधारे

रुपाली चाकणकरांची नार्को टेस्ट झाली पाहिजे. चाकणकर आणि खरात याचे आर्थिक संबंध होते. ईडीने चाकणकरांच्या उत्पन्न स्त्रोताची चौकशी केली पाहिजे. या प्रकरणात सहआरोपी करून चाकणकरांना अटक झाली पाहिजे. चाकणकरांच्या खरात याच्या गुन्ह्याची माहिती होती असा आरोप उद्धवसेनेच्या नेते सुषमा अंधारे यांनी केला आहे. 

20 Mar, 26 11:03 AM

खानापूर तालुक्याला गारपिटीचा तडाखा; शेकडो हेक्टर द्राक्ष बागांना फटका

सांगलीच्या खानापूर तालुक्यात झालेल्या गारपिटीचा फटका द्राक्ष बागांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. तुफानी गारपिटीमुळे द्राक्षांचे घड अक्षरशः उध्वस्त झाले आहेत. भिवघाट, करंजे, बानूरगड, पळशीसह आसपासच्या गावांमध्ये गारपीट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आहे.

20 Mar, 26 11:00 AM

"गृहमंत्र्यांचीच जर या भ्रष्टाचारात टक्केवारी ठरली असेल तर...", सपकाळांची टीका

अशोक खरात प्रकरणावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. "गृहमंत्र्यांच्या बुडाखाली अंधार पसरलाय, वरपासून खालपर्यंत गृह विभागातील अधिकारी-कर्मचारी भोकं पाडून लुटायला बसलीत", असे सपकाळ म्हणाले. 

"देवेंद्र फडणवीस यांच्यातील गृहमंत्र्यांना आपल्या विभागावर वचक ठेवता येत नसेल तर त्यांनी रात्री अपरात्री हूडी घालून पोलिस स्टेशन्सच्या दौऱ्यावर निघायलाच हवे. हे वाचल्यानंतर हुडी घालून पंत दौऱ्यावर जाण्याचा विचार ही करतील कारण त्यांना आपल्या कलागुणांचा वापर करण्याची सवय आहेच. पण त्यांचेच हात या भ्रष्टाचारात जर बरबटलेले असले तर…? मुख्यमंत्री / गृहमंत्र्यांचीच जर या भ्रष्टाचारात टक्केवारी ठरली असेल तर भ्रष्टाचारमुक्त राज्य निर्माण करण्याची अपेक्षा तरी कोणाकडून ठेवायची?", असा सवाल सपकाळ यांनी केला आहे. 

20 Mar, 26 10:54 AM

जालना जिल्ह्यात ठिकठिकाणी गारपीट, अवकाळी पाऊस;वादळी वारा,पावसामुळं शेती पिकांचे नुकसान

जालना जिल्ह्यात काल ठिकठिकाणी अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे. जिल्ह्यात दोन दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यानुसार काल दुपारनंतर ठिकठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला असून, जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील दाभाडीसह धनसावंगी तालुक्यातील रांजणी  या ठिकाणी गारांचा पाऊस झाला आहे. तर परतूर मंठा जालना शहरासह जाफराबाद तालुक्यात मुसळधार तर रिमझिम स्वरूपचा पाऊस पडला आहे. या पावसामुळे काढणीला आलेला गहू ज्वारी मका पिकांचे मोठे नुकसान झालं आहे.

20 Mar, 26 10:50 AM

मी जिवंत आहे आणि तुम्ही लोक यांचे साक्षीदार आहात -नेतन्याहू 

"सर्वात आधी मी हे सांगू इच्छितो की, मी जिवंत आहे आणि तुम्ही सगळे यांचे साक्षीदार आहात. याचसोबत मी सर्व फेक न्यूज फेटाळून लावत आहे", असे विधान इस्रायल पंतप्रधान बेन्जामिन नेतन्याहू यांनी केले. 

सोशल मीडियावर नेतन्याहू इराणच्या हल्ल्यात मारल्या गेल्याच्या चर्चा गेल्या आठवड्यात सुरू झाल्या होत्या. त्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी त्यांच्या मृत्यूबद्दल सुरू झालेल्या चर्चांना उत्तर दिले. 

20 Mar, 26 10:45 AM

बीडच्या केज, आष्टी तालुक्यातील भागात गारपीट.. डोंगर पट्ट्यात गारांचा खच.. झाडांना पानेच राहिली नाही..

बीड जिल्ह्यात कालपासून अवकाळीने कहर केला आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी वारा आणि गारांचा पाऊस. यामुळे फळबागा व शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.. बीड जिल्ह्यातील आष्टी, केज तालुक्यातील अनेक गावांमध्ये काल झालेल्या गारपिठीमुळे डोंगरदऱ्यामध्ये गारांचा खच पाहायला मिळत आहे.तब्बल दोन ते तीन इंच गारांचा खच पडल्याचे दिसून येत आहे. यांचे व्हिडिओ आता समोर आले आहेत.

20 Mar, 26 10:39 AM

एपस्टिन बाबावर एवढी मेहेरबानी का? अंजली दमानियांनी मागितला चाकणकरांचा राजीनामा

नाशिकमधील भोंदू अशोक खरात यांची कृत्ये समोर आल्यानतर राज्यात खळबळ उडाली आहे. विशेषतः रुपाली चाकणकर यांचे या खरातसोबत चांगले संबंध असल्याची चर्चा आहे. चाकणकर आणि खरात यांचे अनेक फोटो व्हायरल झाले असून, त्यातील काही फोटो शेअर करत अंजली दमानियांनी रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. 

टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरLPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाईNarendra Modiनरेंद्र मोदीDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पBenjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहूDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसIPL 2026आयपीएल २०२६Raj Thackerayराज ठाकरेAshok Kharatअशोक खरात