शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: लोकसभेच्या परीक्षेत कोणते मंत्री झाले पास, कोणते नापास?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 07:36 IST

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: गिरीश महाजन, गुलाबराव पाटील आणि अनिल पाटील हे तीन मंत्री जळगाव जिल्ह्याचे आहेत. तेथे जळगाव व रावेर मतदारसंघ येतात. दोन्हींवर भाजपने यश मिळविले.

मुंबई : महायुती सरकारमधील २९ मंत्र्यांच्या गृहजिल्ह्यात महायुतीला कुठे फटका बसला तर कुठे मोठे यश मिळाले. लोकसभा निकालासंदर्भात मंत्र्यांच्या रिपोर्ट कार्डचा विचार करता काहींना उत्तम गुण मिळाले तर काही जण सपशेल नापास झाले.कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर व हातकणंगले हे दोन मतदारसंघ आहेत. तिथे हसन मुश्रीफ मंत्री आहेत. कोल्हापुरात महायुती हरली, पण हातकणंगलेत जिंकली. गिरीश महाजन, गुलाबराव पाटील आणि अनिल पाटील हे तीन मंत्री जळगाव जिल्ह्याचे आहेत. तेथे जळगाव व रावेर मतदारसंघ येतात. दोन्हींवर भाजपने यश मिळविले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याचा गड राखला. शिंदेंचे पुत्र डॉ. श्रीकांत कल्याणमध्ये जिंकले. तिथे भाजपचे रवींद्र चव्हाण मंत्री आहेत. त्यांच्याकडेच पालघरचीही जबाबदारी होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसा यांच्या नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विजयी झाले पण रामटेकची जागा महायुतीने गमावली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा कामठी मतदारसंघ रामटेकमध्ये येतो. पुणे जिल्ह्यात पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ हे चार मतदारसंघ येतात. उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे पाटील आणि चंद्रकांत पाटील हे तीन मंत्री या जिल्ह्याचे आहेत. पुणे आणि मावळमध्ये भाजप-शिंदेसेना जिंकली पण बारामती व शिरूरमध्ये अजित पवार गटाचा पराभव झाला.

मंत्र्यांची मुलेही झाली पराभूत नंदुरबारचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या कन्या डॉ. हीना यांचा दारुण पराभव झाला. अहमदनगरमध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आपल्या मुलाला निवडून आणण्यात अपयशी ठरले. शिवाय त्यांचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या शिर्डीत शिंदेसेना हरली.

लीड मिळूनही झाला पराभव विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे विधानसभा मतदारसंघ ज्या दक्षिण मुंबईत येतात तिथे शिंदेसेनेचा पराभव झाला. लोढांच्या मतदारसंघातून ४७ हजारांचे लीड मिळूनही यामिनी जाधव विजयी होऊशकल्या नाहीत. 

कुठे मिळाले यश, तर कुठे अपयश छगन भुजबळ आणि दादा भुसे असे दोन मंत्री असलेल्या नाशिक जिल्ह्यात महायुती साफ झाली. शिंदेसेनेचे मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या उस्मानाबाद मतदारसंघातही महायुतीचा पराभव झाला. मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रयत्न करूनही बीडचा गड भाजपला राखता आला नाही. दीपक केसरकर व उदय सामंत हे मंत्री असलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये भाजपचे नारायण राणे जिंकले.शिंदेसेनेचे मंत्री संजय राठोड हे आपल्याच पक्षाच्या राजश्री पाटील यांना जिंकवू शकले नाहीत. सुरेश खाडे यांच्याबाबतीत सांगलीत तसेच घडले. शंभूराज देसाई यांच्या सातारा जिल्ह्यात सातारा आणि माढाचा काही भाग येतो. पैकी सातारची जागा भाजपने जिंकली तर माढ्याची जागा गमावली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अतुल सावे आणि अब्दुल सत्तार हे दोन मंत्री आहेत. तिसरे मंत्री संदीपान भुमरे स्वत:च उमेदवार होते. तेथील औरंगाबादची जागा महायुतीने जिंकली, तर जालन्याची गमावली. मंत्री अदिती तटकरे यांच्या रायगडमध्ये त्यांचे वडील सुनील तटकरे जिंकले.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Girish Mahajanगिरीश महाजनDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे