शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

...तर मग मात्र माझी तक्रार करू नका, आमदार नितेश राणेंनी दिला इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 14:20 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या नियोजनाबाबत मार्गदर्शन करताना नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी कार्यकर्त्यांना सूचनावजा इशारा दिला आहे.

राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कंबर कसली आहे. तसेच येथील उमेदवाराची अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तरी राणेंनी प्रचारालाही सुरुवात केली आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या नियोजनाबाबत मार्गदर्शन करताना नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी कार्यकर्त्यांना सूचनावजा इशारा दिला आहे. एक टक्काभर जरी आघाडी कमी मिळाली तरी निधी मिळणार नाही, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, भाजपाच्या एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करताना नितेश राणे म्हणाले की,  मी सर्व सरपंच सहकाऱ्यांना सांगेन की, आपापल्या निवडणुकीप्रमाणे आपल्याला यंत्रणा लावायची आहे. तुम्हाला निवडणुकांमध्ये जेवढं मतदान झालं आहे. त्यापेक्षा जास्तच मतदान या निवडणुकीमध्ये मिळालं पाहिजे. एक टक्काही कमी मतदान चालणार नाही. ४ जून रोजी सगळ्यांचा हिशोबच घेऊन बसणार आहे, असा इशाराच नितेश राणे यांनी दिला.

नितेश राणे पुढे म्हणाले की, ४ जून रोजी मला हवी तशी आघाडी मिळाली नाही, तर नंतर हवा असलेला निधी वेळेत मिळाला नाही तर तक्रार करायची नाही. हेही आज मी सांगतो. हे मी तुमच्याकडे हक्काने मागत आहे, कारण तुम्ही आमच्या आमदार, मंत्री इतर कुणाकडेही आलात तर तुम्हाला कधी रिकाम्या हाती पाठवलेलं नाही. त्यामुळे आज जेव्हा आम्ही तुमच्यासमोर मागायला उभे आहोत. तेव्हा मला नारायण राणे यांचा विजय हा पाहिजे म्हणजे पाहिजेच, असेही नितेश राणे यांनी सांगितले. 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Nitesh Raneनीतेश राणे Narayan Raneनारायण राणे ratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४