शहरं
Join us  
Trending Stories
1
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
2
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
3
"खरं सांगायचं तर..."; फिल्मफेअर पुरस्कार विकत घेतल्याच्या आरोपांवर अभिषेक बच्चन स्पष्टच म्हणाला
4
पती झाला हैवान! लेकासमोरच पत्नीची निर्घृण हत्या, डोळ्यांना, चेहऱ्याला...; अपघाताचा रचला बनाव
5
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
6
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
7
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
8
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
9
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
10
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
11
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
12
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
13
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
14
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
15
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
16
सेंट जॉर्जेस रुग्णालयातील मृत्यूदर का वाढला? दाखल रुग्णांपैकी २४ ते २५ टक्के जण दगावतात
17
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
18
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
19
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
20
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश

‘त्या’ जागांवर ‘वंचित’चा प्रभाव, ‘मविआ’ला जाणार जड? राज्यात सेट बॅक बसण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 12:00 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीत समावेशापासून वंचित बहुजन आघाडी दूर राहिल्याने गेल्या २०१९ च्या निवडणुकीत ‘वंचित’मुळे घडून आलेले मत विभाजन व आघाडीला बसलेल्या फटक्याच्या आकडेवारीकडे लक्ष वेधले जात आहे.

- राजरत्न सिरसाटअकाेला - महाविकास आघाडीत समावेशापासून वंचित बहुजन आघाडी दूर राहिल्याने गेल्या २०१९ च्या निवडणुकीत ‘वंचित’मुळे घडून आलेले मत विभाजन व आघाडीला बसलेल्या फटक्याच्या आकडेवारीकडे लक्ष वेधले जात आहे. गेल्यावेळी ‘वंचित’च्या स्वतंत्र वाटचालीमुळे काँग्रेस आघाडीला साधारण सात जागांवर फटका बसला होता. 

२०१९ च्या लाेकसभा निवडणुकीत काँग्रेसला राज्यात अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. वंचित बहुजन आघाडीला सोबत न घेऊ शकल्याने काँग्रेस आघाडीला मोठा फटका बसल्याचे समाेर आले हाेते. ‘वंचित’च्या १५ जागांवरील उमेदवारांना ९० हजार ते तीन लाखांपर्यंत मते मिळाली हाेती आणि जवळपास सात ठिकाणी ‘वंचित’च्या उमेदवारांनी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना विजयापासून दूर ठेवले. ॲड. प्रकाश आंबेडकर आणि ‘एआयएमआयएम’ यांनी एकत्र येऊन तयार केलेल्या वंचित बहुजन आघाडीला जवळपास १४ टक्के मते मिळाली आणि छत्रपती संभाजीनगर येथून एक खासदारकीही मिळाली.

कुठल्या मतदारसंघात किती मिळाली होती मते? नांदेड : ‘वंचित’चे यशपाल भिंगे यांनी १ लाख ६६ हजार १९६ मते घेतली. काँग्रेसचे अशाेक चव्हाण यांचा केवळ ४० हजार १४८ मतांनी पराभव झाला हाेता. बुलढाणा : राष्ट्रवादीचे डाॅ. राजेंद्र शिंगणे यांचा १,३३,२८७ मतांनी पराभव झाला हाेता. वंचितचे बळीराम सिरस्कार यांनी १,७२,६२७ मते घेतली हाेती.गडचिरोली-चिमूर : काँग्रेसचे डॉ. नामदेव उसेंडी यांचा ७७,५२६ मतांनी पराभव झाला. ‘वंचित’चे रमेश गजबे यांना १ लाख ११ हजार ४६८ मते मिळाली हाेती. परभणी : काँग्रेसचे राजेश विटेकर यांचा ४२,१९९ मतांनी पराभव झाला हाेता. वंचितचे आलमगीर खान यांना १,४९,९४६ मते मिळाली हाेती.  सोलापूर : काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांचा १,५८,६०८ मतांनी पराभव झाला हाेता. ‘वंचित’चे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी १ लाख ७० हजार ७ मते घेतली हाेती. हातकणंगले : स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांचा ९६ हजार ३९ मतांनी पराभव झाला हाेता. ‘वंचित’चे अस्लम सय्यद यांना १ लाख २३ हजार ४१९ मते पडली हाेती. सांगली : काँग्रेसचे विशाल पाटील यांचा १,६४,३५२ मतांनी पराभव झाला हाेता. ‘वंचित’चे गाेपीचंद पडळकर यांना ३ लाख २३४ मते मिळाली हाेती.

...म्हणून वंचितच्या ताकदीचा धसका; ३९ जागांवर तिसऱ्या क्रमांकाची मतेमुंबई : राज्यात बदललेल्या समीकरणानंतर यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही वंचित बहुजन आघाडीची भूमिका निर्णायक ठरणार आहे. २०१९ मधील निवडणुकीत तब्बल ३९ जागांवर तिसऱ्या स्थानी राहिलेल्या वंचितने आपली ताकद दाखवून दिली होती.  

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४