शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

...तर राहुल गांधी प्रत्येक भारतीयाला ताजमहाल बांधून देण्याचेही आश्वासन देतील, देवेंद्र फडणवीस यांचा टोला

By योगेश पांडे | Published: April 15, 2024 11:32 AM

Maharashtra Lok Sabha Election 2024: राहुल गांधी वाट्टेल ती आश्वासने देऊ शकतात. उद्या राहुल गांधी हेदेखील आश्वासन देतील की मी प्रत्येक भारतीयाला ताजमहाल बांधून देतो, या शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेसवर हल्लाबोल केला.

- योगेश पांडे नागपूर - कॉंग्रेसचा जाहीरनामा हा अपयशी जाहीरनामा आहे. त्यांनी छत्तीसगड, राजस्थान, हिमाचलप्रदेशमध्ये निवडून आल्यावर जाहीरनाम्यातील एकही आश्वासन पूर्ण केले नाही. त्यांच्यासाठी जाहीरनामा केवळ एक कागद आहे. त्यांना माहिती आहे की निवडून येणार नाही. त्यामुळेच ते वाट्टेल ती आश्वासने देऊ शकतात. उद्या राहुल गांधी हेदेखील आश्वासन देतील की मी प्रत्येक भारतीयाला ताजमहाल बांधून देतो, या शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेसवर हल्लाबोल केला. नागपुरात सोमवारी आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.

नागपूर पत्रकार क्लब येथे आयोजित या पत्रपरिषदेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आ.प्रवीण दटके, आ.मोहन पते प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी फडणवीस यांनी भाजपच्या केंद्रीय संकल्पपत्राबाबत सविस्तर माहिती दिली. २०१९ मध्ये भाजपने ७५ आश्वासने दिली होती व ती सगळी पूर्ण करण्यात आली. भाजपचे संकल्पपत्र कागदी नाही, ती मोदींची गॅरंटी आहे. देशातील सर्व घटकांचा विकासाचा संकल्प यातून घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे जेवढ्या सरकारी जागा रिकाम्या आहेत त्या सर्व भरण्यावर भर राहणार आहे, असे त्यांनी सांगितले.

समान नागरी कायद्यामुळे महिलांना अधिकार मिळतीलदेशात समान नागरी कायदा लागू व्हावा हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित होते. संविधानाच्या मार्गदर्शक तत्वांमध्येदेखील ते नमूद होते. देशभरात समान नागरी कायदा लागू करण्याचा आमचा प्रयत्न असेल. त्यामुळे महिलांना अधिकार मिळतील, असा दावा फडणवीस यांनी केला.

भाजप संविधान बदलेल हा कॉंग्रेसचा जुमलामागील १० वर्ष भाजपकडे पूर्ण बहुमत आहे. मात्र आमच्या कुठल्याही नेत्यांने संविधान बदलण्याचा विचार केला नाही ,तर त्याचे रक्षण केले. भाजप सत्तेत आल्यावर संविधान बदलल्या जाईल हा कॉंग्रेसचा जुमला आहे. ज्यावेळी विकासाचा विचार मांडता येत नाही व जनहिताचे कार्य करता येत नाही अशा वेळी लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आम्ही राहुल गांधी यांना दोष देणार नाही. कारण ते वाचतच नाही. कुणीतरी काहीतरी लिहून दिले असणार. मल्लिकार्जून खरगे देशाबाबत बोलत आहेत. मात्र कर्नाटकमध्ये दिलेले एकही आश्वासन पूर्ण करू शकलेले नाही याकडे त्यांनी लक्ष द्यावे असा चिमटा फडणवीस यांनी काढला.

कॉंग्रेसला ओबीसींवर बोलण्याचा अधिकारच नाहीआमच्याच सरकारने ओबीसी कल्याणासाठी पुढाकार घेतला. कॉंग्रेस सरकारने ७० वर्ष ओबीसींसाठी संवैधानिक आयोग नेमला नाही. तो आम्ही नेमला. सर्वात जास्त ओबीसी मंत्री या मंत्रीमंडळात आहे. ६० टक्के मंत्री ओबीसी, एससी, एसटी आहे. राज्यात तर ओबीसी मंत्रालय तयार झाले व ओबीसी हिताचे ३० निर्णय झाले. कॉंग्रेसने ओबीसींच्या मुद्द्यावर बोलण्याचा अधिकारच नाही. त्यांनी ओबीसींचा केवळ व्होटबॅंकसारखा वापर केला, असा आरोप फडणवीस यांनी लावला.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४