शहरं
Join us  
Trending Stories
1
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
2
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
3
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
4
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
5
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
6
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
7
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
8
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
9
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
10
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 
11
Pitru Paksha 2025: तिथीनुसार पितरांचे श्राद्ध करा, 'हे' लाभ मिळवा आणि तिथीच माहीत नसेल; तर... 
12
"आम्ही विरोधात असलो तरी..."; रोहित पवारांकडून अंजली कृष्णा प्रकरणावरून अजितदादांची पाठराखण
13
धक्कादायक! बाप्पांसमोर खेळला, बागडला, घरी येऊन आईच्या मांडीवर जीव सोडला; दहा वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
14
'या' कर्मचाऱ्यांना आई-वडील, सासू-सासऱ्यांसोबत वेळ घालण्यासाठी मिळणार रजा!
15
हे आहेत भारताचे सर्वात उंच ५ क्रिकेटर, दोघांची उंची जाणून तर तुम्हीही थक्क व्हाल...!
16
अनंत चतुर्दशी २०२५: बाप्पा 'या' राशींवर करणार अनंत कृपा; धनलाभासह घर, गाडी, जमीन खरेदीचे योग
17
मला वाटते आम्ही भारत आणि रशियाला गमावले...; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
18
पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत येणार का? अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलं स्पष्ट
19
...तेवढ्याच नोंदी ओबीसीमध्ये येऊ शकतात; बावनकुळेंनी सांगितलं कुणाला मिळणार कुणबी प्रमाणपत्र?
20
पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन बिहारला मिळणार? लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार; पाहा, वैशिष्ट्य

‘मविआ’ला महायुतीपेक्षा केवळ 1.18% मते जास्त, मात्र ३० जागा जिंकल्या, महायुती राहिली १७ वर

By यदू जोशी | Updated: June 9, 2024 08:18 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महायुतीपेक्षा केवळ १.१८ टक्के मते अधिक मिळाली; पण आघाडीने ३० जागा जिंकल्या आणि युतीला १७ जागांवर समाधान मानावे लागले.

- यदु जोशीमुंबई : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीलामहायुतीपेक्षा केवळ १.१८ टक्के मते अधिक मिळाली; पण आघाडीने ३० जागा जिंकल्या आणि युतीला १७ जागांवर समाधान मानावे लागले. महाविकास आघाडीला ४३.९१ तर महायुतीला ४२.७३ टक्के मिळाली आहेत. ‘भाजप’ला १ कोटी ४९ लाख ६६ हजार ५७७ मते मिळाली. 

महाविकास आघाडीत सर्वाधिक मते मिळाली ती काँग्रेसला. त्याच्या अगदी खालोखाल आहे ती उद्धवसेना. महायुतीमध्ये सर्वात जास्त मते मिळाली ती भाजपला. त्या खालोखाल शिंदेसेना राहिली. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना १० टक्क्यांपेक्षा अधिक मते आहेत. महायुतीत भाजप आणि शिंदेसेनेला १० टक्क्यांहून अधिक मते आहेत. अजित पवार गट ३.६० टक्क्यांपर्यंतच पोहोचू शकला. सर्व पक्षांमध्ये चांगला स्ट्राईक रेट हा शरद पवार गटाचा राहिला. १० जागा लढून त्यांनी ८ जिंकल्या. 

 राज्यातील प्रमुख पक्षांमध्ये सर्वाधिक जागा लढविणाऱ्या भाजपला सर्वाधिक मतेदेखील मिळाली. भाजपने २८ जागा महायुतीमध्ये लढविल्या होत्या आणि त्यांना २६.१८ टक्के मते मिळाली. काँग्रेसने १७ जागा लढविल्या आणि १३ जिंकल्या. काँग्रेसला १६.९२ टक्के मते मिळाली. भाजपने २८ जागा लढविल्या असल्या तरी केवळ ९ जिंकल्या, १९ जागा गमावल्या. 

कोणत्या पक्षाचा कसा राहिला स्ट्राईक रेट ?- भाजपपेक्षा काँग्रेसचा स्ट्राईक रेट फारच चांगला राहिला. केवळ ४ जागा त्यांनी गमावल्या. - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिंदेसेनेने १५ जागा लढल्या आणि ७ ठिकाणी ते निवडून आले. शिंदेसेनेला १२.९५ टक्के मते पडली.-उद्धवसेनेने २१ जागा लढवून ९ जिंकल्या. या पक्षाला १६.७२ टक्के मते मिळाली. काँग्रेस आणि उद्धवसेनेला जवळपास सारखी मते मिळाली.-शरद पवार गटाने महाविकास आघाडीत १० जागा लढल्या आणि ८ जिंकल्या. या पक्षाला १०.२७ टक्के मते मिळाली. अजित पवार गटाने ४ जागा लढविल्या आणि एक जिंकली. या पक्षाला ३.६० टक्के मते मिळाली.-एमआयएमला ०.६१, बसपाला ०.७३, भाकपला ०.०१, माकपला ०.०३, नोटा ०.७३, इतर ११.२३ असे मतदान झाले. 

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपाcongressकाँग्रेस