शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Lockdown : राज्यात 15 दिवस संचारबंदी; मुख्यमंत्री ठाकरे यांची घोषणा; आज रात्री ८ पासून अंमलबजावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2021 07:15 IST

Maharashtra Lockdown: गेले काही दिवस लॉकडाऊनची चर्चा असताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधताना बुधवारी रात्री ८ पासून संचारबंदीचे कलम १४४ लागू करण्यात येत असल्याचे जाहीर केले.

मुंबई : राज्यात १४ एप्रिलच्या रात्री ८ पासून १ मेच्या सकाळी ७ पर्यंत संचारबंदी लागू करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी केली. या काळात अत्यावश्यक सेवा तसेच सार्वजनिक वाहतूक मात्र सुरू राहणार आहे. कोरोनावरील उपाययोजना आणि लॉकडाऊनचा फटका बसणार असलेल्यांना मदत या पोटी ५४७६ कोटी रुपयांचे पॅकेज मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. ऑक्सिजन आणण्यासाठी लष्कराची मदत मागणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

गेले काही दिवस लॉकडाऊनची चर्चा असताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधताना बुधवारी रात्री ८ पासून संचारबंदीचे कलम १४४ लागू करण्यात येत असल्याचे जाहीर केले. गेले काही दिवस दिवसा जमावबंदी आणि रात्रीची संचारबंदी होती आता पूर्णवेळ संचारबंदी लागू होणार आहे. हा जनताकर्फ्यू असेल, तो जनतेच्या सहकार्याशिवाय यशस्वी होणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. आम्ही हातपाय गाळून बसणार नाही, जिद्दीने लढू आणि कोरोनाविरुद्धची लढाई नक्कीच जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  

 रोजी थांबली तरी, रोटी थांबणार नाही, काळजी सरकार घेईल - मुख्यमंत्री- ५,४७६ कोटी रुपयांचेकोरोना पॅकेज- ७ कोटी लोकांना एक महिना मोफत गहू तांदूळ- बांधकाम कामगारांना प्रत्येकी १५०० रुपयांची मदत देणार- शिवभोजन थाळी महिनाभर मोफत देणार- १२ लाख नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या बँक खात्यात प्रत्येकी १,५०० रुपये टाकण्यात येतील. - नोंदणीकृत पाच लाख फेरीवाल्यांना प्रत्येकी १,५०० रुपयांचे अर्थसहाय्य देणार. रक्कम बँक खात्यात जमा करणार.- १२ लाख परवानाधारक रिक्षाचालकांना प्रत्येकी १,५०० रुपयांचे अर्थसहाय्य देणार.

कोणती कार्यालये सुरू असतील?- केंद्र आणि राज्य सरकारांसह स्थानिक स्वराज्य संस्थेची कार्यालये- अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांची कार्यालये- विमा आणि मेडिक्लेम- निर्मिती आणि वितरणासाठीची औषध कंपन्यांची कार्यालये- न्यायालये, लवाद अथवा चौकशी समिती सुरू. वकिलांची कार्यालये, कोविड प्रतिबंधक कामातील सरकारी कार्यालये वगळता उपरोक्त सर्व आस्थापनांना ५० टक्के उपस्थितीचे नियम बंधनकारक. - हाॅटेल, रेस्टॉरंट आणि बारमध्ये केवळ घरपोच पार्सल सेवा सुरू असेल. यात पार्सल आणण्यासाठी जाता येणार नाही. - रस्त्यालगतची खाद्यपदार्थांची दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरू. केवळ पार्सल वा घरपोच सेवा. - वृत्तपत्रे, मासिके, नियतकालिकांची छपाई तसेच वितरण करता येईल. शिवाय घरपोच सेवा सुरू राहील.

हे बंद- चित्रपट गृह, नाट्यगृह, सभागृहे- व्हिडिओ गेम पार्लर, मनोरंजन तसेच करमणूक केंद्रे आणि पार्क- वाॅटर पार्क- क्लब, जलतरण तलाव,जिम, क्रीडा संकुल- चित्रपट, नाटक, जाहिरातींचे चित्रीकरण- सर्व दुकाने, माॅल, शाॅपिंग सेंटर (जी अत्यावश्यक सेवेत समाविष्ट नाहीत)- सार्वजनिक ठिकाणे यात समुद्र किनारे, बगिचे, मैदाने.- सर्व धार्मिकस्थळे- केश कर्तनालय, स्पा, ब्युटी पार्लर- शाळा आणि महाविद्यालये (दहावी - बारावी परीक्षार्थी आणि त्यासाठी लागणारे मनुष्यबळ वगळून)- सर्व कोचिंग क्लासेस- धार्मिक, राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी

हे राहणार सुरू - रुग्णालये, डायग्नोस्टिक सेंटर, लसीकरण, मेडिकल, औषध निर्मिती कंपन्या तसेच त्यांचे वितरण, वाहतूक व्यवस्था.  - पशु दवाखाने आणि त्यांच्या खाद्यपदार्थांची दुकाने.- किराणा, भाजीपाला, फळे तसेच दूध डेअरी, बेकरी आणि सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांची दुकाने.- शीतगृहे आणि गोदाम- सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (विमानसेवा, ट्रेन, टॅक्सी, ऑटो, सार्वजनिक बससेवा)- विविध देशांचे राजनयिक कार्यालये, दूतावास- मान्सूनपूर्व कामे- स्थानिक प्रशासनाच्या सार्वजनिक सेवा- रिझर्व्ह बँक आँफ इंडिया तसेच त्यांनी निर्देशित केलेल्या अत्यावश्यक सेवा- ‘सेबी’ची कार्यालये,  स्टॉक एक्स्चेंज आदी वित्तीय सेवा- दूरसंचार सेवा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक यंत्रणा- सामानाची वाहतूक- पाणी पुरवठा- शेती आणि शेतीविषयक सेवा- सर्व वस्तूंची आयात-निर्यात- केवळ अत्यावश्यक सेवेसाठी ई-कॉमर्सला परवानगी- अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना परवानगी- सर्व कार्गो सेवा- पावसाळी साहित्याची निर्मिती - पेट्रोल पंप- पायाभूत सुविधांसाठी कार्यरत असणारे डाटा सेंटर, आयटी सेवा- सरकारी तसेच खासगी सुरक्षा व्यवस्था- विद्युत आणि गॅस पुरवठा केंद्रे- एटीएम- पोस्ट सेवा- बंदरे आणि निगडित सेवा- औषधे आणि लस वाहतूक सेवेतील मंडळी- अत्यावश्यक सेवांसाठी लागणारा कच्च्या मालाची निर्मिती आणि वाहतूक- आपत्ती व्यवस्थापन विभागाने अत्यावश्यक सेवेत समाविष्ट केलेल्या बाबी.

वृत्तपत्र अत्यावश्यक सेवेत वृत्तपत्र अत्यावश्यक सेवेत असल्यामुळे वृत्तपत्र निर्मिती, छपाई आणि वितरणावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध असणार नाहीत. वृत्तपत्र विक्रेते, एजंट, वृत्तपत्राची वितरण व वाहतूक यंत्रणा या सर्वांचा समावेश अत्यावश्यक सेवेत आहे.

ऑक्सिजनसाठी लष्कराची मदत मागणारइतर राज्यांतून ऑक्सिजन आणण्यासाठी केंद्राने परवानगी दिलेली आहे. लष्करी विमानांनी हा साठा आणण्याची परवानगी द्यावी आणि त्यासाठी मदत द्यावी अशी विनंती आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्रCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस