नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 08:07 IST2025-11-14T08:06:48+5:302025-11-14T08:07:40+5:30

Shiv Sena Shinde Group News: राज्यभरातील ३१ जिल्ह्यांसाठी निवडणूक प्रभारींची यादी जाहीर करण्यात आली आहे.

maharashtra local body election 2025 shiv sena shinde group in charge for municipal council nagar panchayat elections announced | नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा

नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा

Shiv Sena Shinde Group News: आगामी नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेकडून निवडणूक प्रभारींची आज शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली. पक्षाने राज्यभरातील ३१ जिल्ह्यांसाठी निवडणूक प्रभारींची यादी जाहीर केली असून यात शिवसेना मंत्री खासदार यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख  बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रेरणेने, शिवसेना मुख्य नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी खास रणनीती तयार केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज पक्षाकडून निवडणूक प्रभारी जाहीर करण्यात आले. 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना पक्ष आणि महायुतीला कोणताही धक्का बसू नये, यासाठी अत्यंत काटेकोर नियोजन करत राज्यभरातील ३१ जिल्ह्यांसाठी निवडणूक प्रभारींची यादी जाहीर करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यात संघटन मजबूत करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांवर विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. या प्रभारींना स्थानिक स्तरावर कार्यकर्त्यांशी समन्वय साधून पक्षाची धोरणे, विकासकामे आणि महायुती सरकारची लोकहिताची कामे आणि योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. आज जाहीर झालेल्या निवडणूक प्रभारींमध्ये मंत्री, खासदार, आमदार यांचा समावेश आहे.

निवडणूक प्रभारींची यादी पुढीलप्रमाणे

- सिंधुदुर्ग : आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर

- रत्नागिरी : मंत्री उदय सामंत, माजी आमदार सदानंद चव्हाण, मंत्री योगेश कदम, आमदार किरण सामंत, माजी आमदार राजन साळवी

- रायगड : मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे, आमदार महेंद्र दळवी

- बुलढाणा : केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, आमदार संजय गायकवाड, माजी आमदार संजय रायमुलकर, माजी आमदार शशिकांत खेडेकर

- यवतमाळ : मंत्री संजय राठोड, माजी आमदार दुष्यंत चतुर्वेदी, माजी आमदार विश्वास नांदेकर

- वाशिम : आमदार भावनाताई गवळी

- अकोला : माजी आमदार गोपीकिशन बजोरिया, माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, माजी आमदार विप्लव बजोरिया

- अमरावती : अभिजीत अडसूळ, उपनेते प्रिती बंड, माजी आमदार ज्ञानेश्वर धने पाटील, माजी मंत्री जगदीश गुप्ता, माजी आमदार शशिकांत देशपांडे

- गडचिरोली : मंत्री आशिष जयस्वाल, आशिष देसाई

- चंद्रपूर : माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे, माजी आमदार सहस्राम कोरोते, हर्षल शिंदे, मुकेश जीवतोडे

- गोंदिया : मंत्री आशिष जयस्वाल, आमदार नरेंद्र भोंडेकर

- वर्धा : आमदार मनीषा कायंदे, राज दीक्षित

- नागपूर : माजी मंत्री डॉ. दीपक सावंत, कृपाल तुमाने, किरण पांडव

- लातूर : आमदार तानाजी सावंत, आमदार हेमंत पाटील

- धाराशिव : मंत्री प्रताप सरनाईक, आमदार तानाजी सावंत, माजी आमदार ज्ञानराज चौगुले

- नांदेड : आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंद बोडारकर, आमदार हेमंत पाटील, आमदार बाबुराव कदम

- हिंगोली : आमदार संतोष बांगर

- बीड : आमदार अर्जुन खोतकर, आमदार हिकमत उडान

- परभणी : आमदार अर्जुन खोतकर, उपनेते आनंदराव जाधव

- जालना : आमदार अर्जुन खोतकर

- छत्रपती संभाजीनगर : आमदार संजना जाधव, आमदार विलास भुमरे, आमदार रमेश बोरणारे, आमदार अब्दुल सत्तार

- कोल्हापूर : मंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक

- सोलापूर : शहाजी बापू पाटील, माजी आमदार सिद्धाराम महेत्रे, माजी आमदार उत्तमप्रकाश खंदारे, माजी आमदार जयवंतराव जगताप

- सांगली : खासदार धैर्यशील माने, आमदार सुहास बाबर

- सातारा : मंत्री शंभूराज देसाई, आमदार महेश शिंदे

- पुणे : खासदार श्रीरंग बारणे, आमदार विजय शिवतारे, आमदार शरद सोनावणे

- अहिल्यानगर : आमदार विठ्ठल लंगे पाटील, माजी खासदार सदाशिव लोखंडे, आमदार अमोल खताळ, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे 

- धुळे : आमदार मंजुळा गावित

- नंदुरबार : आमदार आमश्या पाडवी, आमदार चंद्रकांत रघुवंशी, माजी आमदार गिरीश चौधरी

- जळगाव : मंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर आप्पा पाटील, आमदार चंद्रकांत सोनावणे, आमदार अमोल पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, माजी आमदार गिरीश चौधरी

- नाशिक : आमदार सुहास कांदे, आमदार किशोर दराडे, माजी आमदार धनराज म्हाले, माजी खासदार हेमंत गोडसे, उपनेते विजय करंजकर

Web Title : शिवसेना ने नगर पालिका चुनावों के लिए प्रभारियों की घोषणा की; एकनाथ शिंदे ने की घोषणा

Web Summary : एकनाथ शिंदे के नेतृत्व वाली शिवसेना ने 31 जिलों में आगामी नगर पालिका और नगर पंचायत चुनावों के लिए चुनाव प्रभारियों की घोषणा की। पार्टी को मजबूत करने और सरकारी पहलों को बढ़ावा देने के लिए मंत्रियों और सांसदों को जिम्मेदारियां सौंपी गई हैं।

Web Title : Shiv Sena Announces Incharges for Municipal Elections; Eknath Shinde Declares

Web Summary : Shiv Sena, led by Eknath Shinde, announced election in-charges for upcoming municipal and Nagar Panchayat elections across 31 districts. Ministers and MPs are assigned responsibilities to strengthen the party and promote government initiatives.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.