शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
2
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
3
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
4
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
5
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
6
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
7
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
8
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
9
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
10
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
11
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
12
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
13
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
14
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
15
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
16
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
17
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
18
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
19
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!
20
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात आघाडीवर- मनमोहन सिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 3:19 PM

मनमोहन सिंग यांची मोदी सरकारवर टीका

आर्थिक मंदीचा महाराष्ट्राला सर्वाधिक फटका- मनमोहन सिंगमुंबई: सरकारच्या उदासीनतेचा फटका सर्वसामान्यांना बसत असून शेतकरी आत्महत्यांच्या बाबतीत महाराष्ट्र देशात आघाडीवर असल्याचं माजी पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणाले. सरकारच्या धोरणांमुळे निर्माण झालेल्या आर्थिक मंदीचा सर्वाधिक महाराष्ट्राला बसल्याचंही त्यांनी म्हटलं. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 'सध्या शेतकरी आत्महत्यांच्या बाबतीत महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. आर्थिक मंदी, सरकारच्या उदासीनतेचा परिणाम देशाच्या भविष्यावर होत आहे. आर्थिक मंदीचे परिणाम मुंबईसह महाराष्ट्रात दिसू लागले आहेत. गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रातील सर्वाधिक कारखाने बंद पडले आहेत,' असं माजी पंतप्रधानांनी म्हटलं. सर्वसामान्यांसाठी योजना आखण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका त्यांनी केली.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पीएमसी बँक प्रकरणात लक्ष घालून 16 लाख खातेदारांना दिलासा द्यावा, असं आवाहन सिंग यांनी केलं. 'पीएमसी बँकेच्या खातेदारांसोबत घडलेला प्रकार दुर्दैवी आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून 16 लाख खातेदारांना सहन कराव्या लागत असलेल्या अडचणी दूर कराव्यात,' असं सिंग म्हणाले. केंद्र आणि राज्य सरकारसह रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं या प्रकरणात लक्ष घालून ग्राहकांना न्याय द्यावा, असं आवाहनदेखील त्यांनी केलं. सरकारच्या आर्थिक धोरणांचा मोठा फटका महाराष्ट्रातील उद्योगांना बसला आहे. सतत चार वर्षांपासून राज्यातील उत्पादन घटत आहे. भाजपाकडून प्रशासनाच्या डबल इंजिन मॉडेलची जाहिरातबाजी सुरू आहे. मात्र हे मॉडेल पूर्णपणे फसलं आहे. महाराष्ट्रातील उद्योगांच्या उत्पादनात सतत होणारी घट हेच अधोरेखित करते, अशा शब्दांत माजी पंतप्रधानांनी सरकारच्या विकासाच्या दाव्यांचा समाचार घेतला.

टॅग्स :Manmohan Singhमनमोहन सिंगEconomyअर्थव्यवस्था