शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

"महाराष्ट्र पुरोगामी हे थोतांड, हे तर प्रचंड...'; फुले, शाहू, आंबेडकर यांचं नाव घेत गोपीचंद पडळकर स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 10:35 IST

"'अपने तो अपने होते है, पराये अपने नहीं होते', हे ध्यानात ठेवा. माझी सारखी कशाला परीक्षा बघताय? बघू नका. माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे."

लोक म्हणतात, महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे, हे सर्व थोतांड आहे. हे भाषणात सांगायपुरतेच आहे. महाराष्ट्र हे फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांवर चालतो, हे केवळ भाषणापुरतेच आहे. प्रचंड जातीयवादी हे राज्य आहे, हे पहिले डोक्यात फिट करून ठेवा. असे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे. तसेच, आपण मुख्यमत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे पूर्ण वेळ पाठपुरावा करून आपल्या भागासाठी सर्वच विभागांचा जास्तीत जास्त निधी आणू, असे आश्वासनही त्यांनी यावेळी आपल्या मतदारसंघातील जनतेला दिले. ते सांगलीमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.

महाराष्ट्र पुरोगामी राज्य, हे थोतांड -पडळकर म्हणाले, "मी सीएम आणि डीसीएम यांच्याकडे पूर्ण वेळ पाठपुरावा करून आपल्या भागासाठी सर्व विभागांचा जास्तीत जास्त निधी आणेन. त्यामुळे तुम्ही अजिबात चिंता करू नका, अजिबात काळजी करू नका. इतर कुठल्याही समाजाचे विषय असतील तर मला सांगा. कुठल्याही समाजाचा विषय. हे बघा, लोक म्हणतात की, महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे, हे थोतांड आहे सर्व. हे भाषणात सांगायपुरतं आहे. 

महाराष्ट्र फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांवर चालतो, फक्त भाषणापुरतं - पडळकर पुढे म्हणाले, "महाराष्ट्र हे फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांवर चालतो, हे फक्त भाषणापुरतं आहे. प्रचंड जातीयवादी हे राज्य आहे, हे पहिले डोक्यात फिट करून ठेवा. हे आपण बदलू शकत नाही. आपल्याला काम करायचं आहे. जाती-जातीतल्या ज्या भिंती आहेत त्या तोडून सगळ्या लोकांसाठी एकत्रितपणे आपल्याला काम करावं लागणार आहे. गावागावात आपल्याला एकत्रित यावं लागणार आहे, वैचारिकपणे एकत्रित यावं लागणार आहे."

यावेळी "'अपने तो अपने होते है, पराये अपने नहीं होते', हे ध्यानात ठेवा. माझी सारखी कशाला परीक्षा बघताय? बघू नका. माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे. असे झाले तसे झाले, बघितलेच नाही. फोनच उचलला नाही, अरे कुणा कुणाचा उचलू? बाहिरा झालोना मी, फोन कुणा कुणाचा उचलू? किती फोन येत आहेत," असेही पडळकर यावेळी म्हणाले.

टॅग्स :Gopichand Padalkarगोपीचंद पडळकरSangliसांगलीBJPभाजपा