मुंबईसह महाराष्ट्र गारठला; शुक्रवारपर्यंत थंडीचा जोर राहणार; उत्तरेकडील बर्फवृष्टीचा परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 08:23 IST2025-01-08T08:22:51+5:302025-01-08T08:23:17+5:30
मुंबई महानगरात किमान तापमान १२ ते १४ राहील. त्यानंतर यात हळूहळू वाढ होण्याचा अंदाज

मुंबईसह महाराष्ट्र गारठला; शुक्रवारपर्यंत थंडीचा जोर राहणार; उत्तरेकडील बर्फवृष्टीचा परिणाम
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : थंडीमुळे पुन्हा एकदा मुंबईसहमहाराष्ट्र गारठला आहे. राज्यातील अनेक शहरांचे किमान तापमान १३ तर मुंबई महानगर प्रदेशाचे तापमान १४ अंशाच्या आसपास नोंदविण्यात आले आहे. शुक्रवारपर्यंत थंडीचा जोर कायम राहणार असून, शुक्रवारनंतर मात्र तापमानात वाढ होण्यास सुरुवात होईल, अशी माहिती हवामान अभ्यासकांनी दिली.
उत्तर भारतातील बर्फवृष्टीमुळे मुंबईसह राज्यभरातील गारठ्यात वाढ झाली आहे. शुक्रवारपर्यंत गारठा राहील. मुंबई महानगरात किमान तापमान १२ ते १४ राहील. त्यानंतर यात हळूहळू वाढ होईल, असे हवामान अभ्यासक अथ्रेया शेट्टी यांनी सांगितले.
मुंबई महानगर प्रदेश (स्त्रोत - वेगरिज ऑफ दी वेदर)
- मुंबई १५.२
- ठाणे १६.३
- नवी मुंबई १६.५
- पनवेल १५.७
- कल्याण १५.५
- डोंबिवली १५.७
- उल्हासनगर १५.१
- तलासरी १२.५
- बदलापूर १३.७
- कर्जत १३.९
- अंबरनाथ १४.९
राज्य (स्त्रोत - हवामान विभाग)
- जळगाव ८.८
- धाराशिव १२
- नाशिक १२.२
- अहिल्यानगर १२.४
- परभणी १३.५
- सांगली १३.६
- सातारा १३.९
- मालेगाव १३.६
- महाबळेश्वर १४
- अलिबाग १४.९
- छ. संभाजीनगर १५
मुंबईसह कोकणात मंगळवारी पहाटेचे किमान तापमान सरासरीच्या खाली होते. मुंबईत किमान तापमान सरासरीच्या तुलनेत २ अंशाने कमी म्हणजे १५.२ इतके होते. शुक्रवारपर्यंत मुंबईसह संपूर्ण कोकण व महाराष्ट्रात थंडी जाणवेल. ११ जानेवारीपासून पुन्हा थंडीचा प्रभाव काहीसा कमी होईल. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात कदाचित काहीसे ढगाळ वातावरण राहील.
- माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ