शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल; गृहमंत्री म्हणाले, पोलीस कारवाई करतील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2022 11:10 IST

Kirit Somaiya Attacked in Mumbai: "पोलिसांना वेगळे आदेश देण्याची गरज नाही. पोलिसांना त्यांचे काम माहिती आहे."

Kirit Somaiya Attacked in Mumbai: मुंबई शहरात पुन्हा एकदा भाजप विरुद्ध शिवसेना वाद सुरू झाला आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर खार पोलीस स्टेशनबाहेर हल्ला करण्यात आला. शिवसैनिकांच्या हल्ल्यात सोमय्यांच्या गाडीची काच फुटली आणि त्यांच्या तोंडालाही दुखापत झाली. या हल्ल्यावर आता महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. "कालची घटना दुर्दैवी, मात्र सर्वांनी समजूतदारपणा दाखवावा. त्या संदर्भात पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे,- पोलीस योग्य ती कारवाई करतील," असे पाटील म्हणाले. 

'पोलीस कारवाई करतील...'या प्रकरणावर माध्यमांशी बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले की, "गेले दोन दिवस मुंबईत हनुमान चालीसाच्या नावाने गोंधळ घालण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी योग्य ती कारवाई म्हणून राणा दाम्पत्याला अटक केली. पण, रात्री किरीट सोमय्यांवर हल्ल्याची जी घटना घडली आहे, त्याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार पोलीस आपली कारवाई करतील. राष्ट्रपती राजवटीची मागणी कोणी केली अस काही दिसत नाही. अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे", असं वळसे पाटील म्हणाले.

"समजूतदारपणा दाखवावा"ते पुढे म्हणाले की, "घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. पण आता त्यात सगळ्यांनीच समजुतीने सहकार्य करायला हवं. दगडफेक झाली आहे हे खरं आहे. ती कुणाकडून झाली काय झाली, हा तपासाचा भाग आहे. राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार केलीये, त्याच्यावर पोलीस चौकशी करून कारवाई करतील. पोलिसांना वेगळे आदेश देण्याची गरज नाही, त्यांना त्यांचे काम काय आहे हे माहिती आहे. त्याप्रमाणे त्यांनी त्यांचे कर्तव्य पार पाडलं पाहिजे", असंही ते म्हणाले.

काल रात्री नेमकं काय झालं?अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी दिलेल्या हनुमान चालीसा पठणाच्या इशाऱ्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. राणा दाम्पत्याला अटक केल्यानंतर किरीट सोमय्या खार पोलीस स्टेशनमध्ये त्यांना भेटण्यासाठी गेले, पण परत जाताना त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. यात किरीट सोमय्या किरकोळ जखमी देखील झाले. त्या हल्ल्यानंतर आता भाजपनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यभरात भाजप कार्यकर्त्यांनी सुचेल तशाप्रकारे आंदोलन करावे. आता ही लढाई भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी सरकार आहे. या लढाईसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहनच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. 

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याDilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलShiv SenaशिवसेनाBJPभाजपा