शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
3
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
4
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
5
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
6
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
7
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
8
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
9
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
10
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
11
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
12
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
13
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
14
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
15
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
16
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
17
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
18
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
19
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
20
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या

गृहमंत्री अनिल देशमुख, मुंबई पोलीस आयुक्तांची हकालपट्टी व्हायलाच हवी; वाझेंच्या अटकेनंतर सोमय्यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2021 06:54 IST

अटकेपासून वाचण्यासाठी शुक्रवारीच जिल्हा सत्र न्यायालय ठाणे येथे अंतरीम जामिनासाठी वाझे यांनी अर्ज दाखल केला होता. याप्रकरणी 19 मार्चला सुनावणी होणार होती. (Sachin Waze)

मुंबई - उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटके सापडल्याप्रकरणी आता एनआयएने एपीआय सचिन वाझे (Sachin Vaze) यांना अटक केली आहे. तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर एनआयएने त्यांना अटक केली. यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. "सचिन वाझेंना अटक. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग (Paramvir Singh) यांची हकालपट्टी झालीच पाहिजे," असे ट्विट किरीट सोमय्या यांनी केले आहे. आपल्या या ट्विटसोबत त्यांनी एक व्हिडिओदेखील जोडला आहे. (Maharashtra HM Anil Deshmukh and Mumbai Police Commissioner Paramvir Singh should be sacked BJP leader Kirit Somaiya demand after Sachin Waze's arrest)

"सचिन वाझेची अटक झाली, पण त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करणारे मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनाही जाब तर द्यावाच लागणार आहे. शिवसेनेचे प्रवक्ता 'ओसामा' सचिन वाझेसाठी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय सांगणार आहेत? असा सवाल करत, अजून तर काय काय बाहेर येणार? तेही पाहायला हवे, असे किरीट सोमय्या यांनी ट्विट सोबत जोडलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

अँटिलिया प्रकरण : एनआयएची मोठी कारवाई, अखेर API सचिन वाझे यांना अटक; 13 तासांच्या झडतीनंतर बेड्या

तत्पूर्वी अटकेपासून वाचण्यासाठी शुक्रवारीच जिल्हा सत्र न्यायालय ठाणे येथे अंतरीम जामिनासाठी वाझे यांनी अर्ज दाखल केला होता. याप्रकरणी 19 मार्चला सुनावणी होणार होती. एनआयएने सांगितल्यानुसार, सचिन वाझे यांना आईपीसीच्या कलम 286, 465, 473, 506(2), 120 बी आणि 4 (ए)(बी)(आय) स्फोटक वस्तू कलम 1908 अंतर्गत अटक करण्यात आली आहे.

"पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे एका शिवसेना नेत्यामध्ये आर्थिक संबंध", किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

एटीएसकडून वाझेंची तब्बल दहा तास चौकशी - अंबानी यांच्या अँटिलिया घराबाहेर स्फोटके आणि धमकीचे पत्र असलेली स्कॉर्पिओ कार सापडल्यानंतर, या प्रकरणाचा तपास वाझे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. मात्र, या स्कॉर्पिओ कारचे मालक व्यापारी मनसुख यांचा मृत्यू झाला आणि वाझे संशयाच्या भोवऱ्यात सापडले. या प्रकरणी विरोधी पक्षाने त्यांचे निलंबन करून तत्काळ अटकेची मागणी केली होती. यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा तपास राज्य दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) सोपविला होता.  दहशतवाद विरोधी पथकानेही मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणांत वाझे यांची तब्बल दहा तास चौकशी केली.

Mansukh Hiren Case : मनसुख हिरेन आणि सचिन वाझेंमधील संबंधांबाबत हिरेन यांच्या वकिलांचा मोठा गौप्यस्फोट, केला असा दावा

विरोधकाच्या आक्रमक  पवित्र्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी गृहमंत्र्यांनी वाझे यांची बदली करण्याचे आदेश दिले. यानंतर शुक्रवारी त्यांची विशेष शाखा १ येथे बदली करण्यात आली आणि त्यांच्याकडे नागरी सुविधा केंद्राची जबाबदारी देण्यात आली. बदली झाल्यानंतर वाझे यांनी प्रतिक्रिया देताना, मी क्राईम ब्रान्चच्या सेवेतून मुक्त झालो, असे सांगत अधिक बोलणे टाळले होते. 

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याsachin Vazeसचिन वाझेMansukh Hirenमनसुख हिरणMukesh Ambaniमुकेश अंबानीUddhav Thackerayउद्धव ठाकरेParam Bir Singhपरम बीर सिंगBJPभाजपाShiv Senaशिवसेना