"पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे एका शिवसेना नेत्यामध्ये आर्थिक संबंध", किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 10:00 PM2021-03-13T22:00:59+5:302021-03-13T22:02:05+5:30

Sachin vaze has financial ties with a Shiv Sena leader : न्यायालयाने सचिन वाझे यांचा अटकपूर्वक जामीन नाकारला असतांनाही पोलीस कसली वाट पाहत आहेत.वाझे यांना अटक का केली जातं नाही. असा सवाल किरीट  सोमय्या यांनी यावेळी उपस्थित केला.

"Police officer Sachin vaze has financial ties with a Shiv Sena leader", a serious allegation made by Kirit Somaiya | "पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे एका शिवसेना नेत्यामध्ये आर्थिक संबंध", किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

"पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे एका शिवसेना नेत्यामध्ये आर्थिक संबंध", किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

googlenewsNext

ठाणे : सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin vaze) आणि एका शिवसेना नेत्याचे आर्थिक संबंध आहेत. असा गोप्यस्फ़ोट भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya)  यांनी शनिवारी ठाण्यात केला. मनसूख हिरेन यांच्या कुटुंबीयांची सोमय्या यांनी शनिवारी तिसऱ्यांदा भेट घेतली यावेळी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी हें सांगितलं. वाझे हा मुख्यमंत्री उध्द्वव ठाकरे यांचा प्रवक्ता असल्याने त्याला वाचविल जातं असल्याचं त्यांनी पुढे सांगितलं. ("Police officer Sachin vaze has financial ties with a Shiv Sena leader", a serious allegation made by Kirit Somaiya)

न्यायालयाने सचिन वाझे यांचा अटकपूर्वक जामीन नाकारला असतांनाही पोलीस कसली वाट पाहत आहेत.वाझे यांना अटक का केली जातं नाही. असा सवाल किरीट  सोमय्या यांनी यावेळी उपस्थित केला. वाझे यांना लोकांना मारण्याचं लायन्स मुख्यमंत्री उध्द्वव ठाकरे यांनी दिलं आहे का?असा सवालही सोमय्या यांनी यावेळी उपस्थित केला. मुख्यमंत्री यांची हिरेन प्रकरणातील वागणूक ही महाराष्ट्राला लाज वाटणारी आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चोकशी  झाल्यानंतर मोठं कारस्थान उघडं होईल. त्यातून समजेल की उध्द्वव ठाकरे यांनी वाझे यांना का वाचवलं. सचिन वाझे आणि शिवसेनेच्या एका नेत्याचे आर्थिक संबंध आहेत. असा आरोप करताना लवकरच त्याचे नाव उघडं होईल असं सोमय्या म्हणाले. दरम्यान मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंह हें ज्या प्रकारे वाझे यांचं प्रकरण हातळत आहे. त्याबद्दल त्यांनाही जाब विचारण्याची गरज असल्याचं सोमय्या पुढे म्हणाले. तसेच  मृत मनसुख हिरेन यांच्या कुटुंबीयांची या प्रकरणाची सखोल चोकशी करून दोषींना अटक करण्याची मागणी असल्याचं सोमय्या यांनी सांगितलं.

Web Title: "Police officer Sachin vaze has financial ties with a Shiv Sena leader", a serious allegation made by Kirit Somaiya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.