शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

"हा हंगामी आजार, सावध राहा"; HPMV व्हायरसमुळे राज्याच्या आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 10:35 IST

चीनमधील ह्युमन मेटापन्यूमोव्हायरच्या प्रकरणांच्या वाढीमुळे राज्याच्या आरोग्य विभागाने सावधगिरीचा सल्ला दिला आहे.

Maharashtra HMPV: चीनमधल्या ह्युमन मेटापन्यूमो व्हायरसच्या रुग्णांमध्ये होत असलेल्या वाढीमुळे जगभरात पुन्हा एकदा चिंता निर्माण झाली आहे. या विषाणूची लागण झालेल्या रुग्णांमध्ये श्वास घेण्यास त्रास होणे आणि फ्लूसारखी लक्षणे दिसून येतात. चीनमध्ये एचएमपी विषाणूचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे आणि मुख्यतः लहान मुले आणि वृद्ध लोकांना याचा फटका बसत आहे. चीनमध्ये आरोग्य संकटाची गंभीर चिंता निर्माण झाल्याने शेजारील देशांना काळजी घ्यावी लागत आहे. चीनमधल्या या नव्या संकटामुळे भारत सतर्क झाला असून राज्याच्या आरोग्य विभागाने  मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

जगभरातल्या कोरोनाच्या संकटानंतर पाच वर्षांनी चीनमध्ये नवीन आरोग्याची समस्या उभी राहिली आहे. चीनमध्ये एचएमपीव्ही या विषाणूचा संसर्गाने गंभीर रुप धारण केलं आहे. त्यामुळे आता  भारतातही आरोग्य यंत्रणा सज्ज होत आहेत.  चीनमध्ये एचएमपीव्ही प्रकरणांमध्ये झाल्यानंतर, आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी रविवारी राज्यभरातील उपसंचालक, सिव्हिल सर्जन आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना श्वसन संसर्गाच्या आणि इन्फ्लूएंझा सारख्या आजारांवर लक्ष ठेवण्याचे आदेश जारी केले.

चीनमधील एचएमपीव्ही संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. घाबरु नका पण सतर्क राहा अशा सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. तसेच सर्दी खोकल्याच्या रुग्णांचे नियमित सर्वेक्षण करण्याचे निर्देशही डॉ. नितीन अंबाडेकर यांनी दिले आहेत. यासोबत स्वच्छतेची नियमावली पाळण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. महाराष्ट्रात  एचएमपीव्हीचा एकही रुग्ण आढळलेला नाही तरी सावधगिरी बाळगावी असे आवाहन करण्यात आलं आहे.

चीनमध्ये नोंदवलेल्या एचएमपीव्ही प्रकरणांबाबत घाबरण्याची गरज नाही. आवश्यक ती खबरदारी राबविण्यात येत असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये. आत्तापर्यंत, महाराष्ट्रात एचएमपीव्हीचे एकही प्रकरण नोंदवले गेले नाही, असे आवाहन आरोग्य विभागाने लोकांना दिलं आहे. "चीनमध्ये एचएमपीव्हीचा उद्रेक झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. हा विषाणू तीव्र श्वसन संक्रमणाचे एक महत्त्वाचे कारण आहे आणि २००१ मध्ये नेदरलँड्समध्ये पहिल्यांदा याची नोंद करण्यात आली होती. हा एक सामान्य श्वासोच्छवासाचा विषाणू आहे जो प्रामुख्याने श्वसनमार्गाच्या संसर्गास कारणीभूत ठरतो," असे अधिकाऱ्यांनी म्हटलं.

तसेच हा एक हंगामी आजार आहे, जो सामान्यत: हिवाळ्यात आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या काळात होतो, जो रेस्पिरेटरी सिन्सिशिअल व्हायरस आणि फ्लू सारखा असतो, असं राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राच्या संचालकांनी निवेदन जारी करुन म्हटलं आहे.

नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी?

खोकला किंवा शिंका येत असल्यास रूमालाचा वापर करा

साबणाने वेळोवेळी हात धुवा किंवा सॅनिटायझरचा वापर करा 

भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक अन्न खा

घर कार्यालयांमध्ये व्हेटिंलेशनची काळजी घ्या 

टिशू पेपर आणि रुमालाचा फेरवापर टाळा 

आजारी लोकांशी जवळचा संपर्क टाळा 

डोळे, नाक, तोंडाला वारंवार स्पर्श करणे टाळा

सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळा

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेणे टाळा 

टॅग्स :HMPV Virusह्युमन मेटापन्यूमोव्हायरसchinaचीनHealthआरोग्यMaharashtraमहाराष्ट्र