शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government: ईडीची फाईल आताच कशी काय उघडते?; शिवसेनेकडून नव्या मित्राचा 'आदर्श' बचाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 10:39 IST

गेल्या अनेक दिवसांपासून रंगलेल्या राजकीय नाट्याला आज पूर्णविराम मिळणार आहे.

मुंबईः गेल्या अनेक दिवसांपासून रंगलेल्या राजकीय नाट्याला आज पूर्णविराम मिळणार आहे. महाविकास आघाडीचे नेते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. उद्धव ठाकरेंच्या शपथविधीमुळे शिवसैनिकांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो आहे. भाजपाला आपल्या धारदार विधानांनी जेरीस आणणारे संजय राऊतांनीही महाराष्ट्रासाठी आज ऐतिहासिक दिवस असल्याचं म्हटलं आहे. माननीय उद्धव ठाकरे आज शिवतीर्थावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. महाराष्ट्रासाठी आज आनंदाचा तितकाच ऐतिहासिक दिवस आहे. साधारण 20 वर्षांनंतर पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री हा महाराष्ट्रात शपथ घेतोय, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. 

महिन्याभराचा संघर्ष आपण पाहिलेलाच आहे, त्या संघर्षाला अखेर यश मिळालं आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ नये म्हणून कायदेशीर आणि राजकीय असे अनेक डावपेच टाकण्यात आले. त्या सगळ्यांवर मात करून आजचा दिवस उगवलेला आहे. मला वाटतं हे सरकार पूर्ण पाच वर्षं टिकेल. केंद्राच्या ताब्यात ज्या संस्था आहेत, त्यांचा गैरवापर पुन्हा केला जाईल, असं म्हणत त्यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. कालपर्यंत जे सत्ताधारी होते, त्यांच्यासुद्धा ईडी किंवा सीबीआयमार्फत चौकशा व्हाव्यात, अशा प्रकारचे काही पुरावे समोर आलेले आहेत. परंतु उद्धव ठाकरेंनी आधीच स्पष्ट केलेलं आहे की, आम्ही सुडाचं राजकारण करणार नाही.तुम्ही चौकशांचा कितीही ससेमिरा लावला. तुम्ही कितीही अडथळे आणले तरी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील हे जे सरकार आहे. त्याला अजिबात तडा जाणार नाही. आम्ही संकटांवर मात करू आणि सरकार टिकवू. सरकारमध्ये सहभागी होतानाच ईडीची फाइल कशी काय ओपन केली जाते. हे सर्व हातखंडे वापरण्यात आलेले आहेत, आदर्श प्रकरणावरून राऊतांनी भाजपावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंचं सरकार येऊ नये, यासाठी राष्ट्रपतींपासून राजभवनापर्यंत आणि सीबीआयपासून ईडीपर्यंत सर्वांचा दुरुपयोग करण्यात आला, पण या सर्वांनाच आम्ही मात दिलेली आहे. पंतप्रधानांनीही उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत, असंही संजय राऊत म्हणाले आहेत. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस