शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

Maharashtra Government: 'बहुमत होतं तर ऑपरेशन लोटससाठी चांडाळ चौकडीची नियुक्ती का केली?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 07:40 IST

शिवसेनेकडून भाजपा, अजित पवारांचा खरपूस समाचार

मुंबई: फडणवीस यांच्याकडे बहुमत होतं तर मग बहुमताचा आकडा गाठण्यासाठी नव्या चांडाळ चौकडीची नियुक्ती 'ऑपरेशन लोटस'च्या नावे का केली?, असा सवाल सामनामधून शिवसेनेनं उपस्थित केला आहे. नितीन गडकरींनी क्रिकेटच्या खेळाची झालं तरी 'सत्यमेव जयते' या ब्रीदाचा पराभव जुगाऱ्यांना करता येणार नाही, अशा शब्दांत शिवसेनेनं भाजपाला ठणकावलं आहे. राज्यातील जनतेनं काळजी करू नये, असं आवाहनदेखील शिवसेनेनं केलं आहे.महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आणि प्रतिष्ठेचा बाजार सत्तांधांनी मांडला आहे. महाराष्ट्राशी ज्यांचं भावनिक नातं अजिबात नाही असेच लोक शिवरायांच्या महाराष्ट्राच्या इज्जतीची अशी लक्तरं काढू शकतात. महाराष्ट्राच्या जडणघडणीत, महाराष्ट्राच्या निर्मितीत या मंडळींनी रक्ताचा सोडाच, पण घामाचा एक थेंबही गाळला नसल्यानं हा राजकीय घोटाळा त्यांनी केला आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तीन पक्षांनी मिळून १६२ आमदारांचं पत्र राजभवनात आता सादर केलं. हे सर्व आमदार राजभवनात राज्यपालांसमोर उभे राहायला तयार आहेत. इतकं स्पष्ट चित्र असताना राज्यपालांनी कोणत्या बहुमताच्या आधारावर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली?, असा सवाल शिवसेनेनं उपस्थित केला आहे. राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांचादेखील शिवसेनेनं खरपूस समाचार घेतला आहे. अजित पवार यांचा सर्व खेळ संपला तेव्हा 'शरद पवार हेच आमचे नेते व मीच राष्ट्रवादीचा पाईक' अशी बतावणी त्यांनी केली. ही पराभूताची मानसिकता आहे. शरद पवार यांचे पुतणे म्हणून तुम्ही स्वत:ला मिरवत असाल तर आधी बारामतीच्या आमदारकीचा, पक्षातील सर्व पदांचा राजीनामा देऊन तुम्ही स्वतंत्र राजकारण करायला हवं होतं. पण काकांनी जे कमावलं तेच चोरून 'मीच नेता, माझाच पक्ष' असं सांगणं हा वेडेपणाचा कळस आहे, अशी घणाघाती टीका शिवसेनेनं केली आहे.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारShiv Senaशिवसेना