CoronaVirus News: कोरोना संकटात नोकरीच्या संधी! आरोग्य विभागात १६ हजार पदांसाठी मेगाभरती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 05:04 PM2021-05-06T17:04:02+5:302021-05-06T17:04:32+5:30

CoronaVirus News: कोरोना संकटात आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण; तिसऱ्या लाटेचाही धोका असल्यानं आरोग्य विभागात मोठी भरती

maharashtra government to recruit 16 thousand persons in health department amid corona crisis | CoronaVirus News: कोरोना संकटात नोकरीच्या संधी! आरोग्य विभागात १६ हजार पदांसाठी मेगाभरती

CoronaVirus News: कोरोना संकटात नोकरीच्या संधी! आरोग्य विभागात १६ हजार पदांसाठी मेगाभरती

Next

मुंबई: देशात कोरोनाची दुसरी लाट दिवसागणिक आणखी धोकादायक स्वरूप धारण करत आहे. यानंतर पावसाळ्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिला आहे. त्यामुळे राज्य सरकार आरोग्य विभागात तब्बल १६ हजार पदांची भरती करणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. यामध्ये क आणि ड वर्गातील एकूण १२ हजार पदांचा, तर अ आणि ब वर्गातील प्रत्येकी २ हजार पदांचा समावेश असेल.

येत्या आठवड्याभरात यासंदर्भातली शासन पातळीवरची निर्णय प्रक्रिया पार पाडली जाईल आणि त्यानुसार भरती प्रक्रियेला सुरुवात केली जाईल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. यासंदर्भात पुढील निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार आरोग्य विभाग, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना देण्याचा ठराव मंत्रिमंडळ बैठकीत झाल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. रुग्णसेवेशी संबंधित पदांची १०० टक्के भरती करण्याची आवश्यकता असल्याचं आम्ही मंत्रिमंडळ बैठकीत सांगितलं. आरोग्य विभाग, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या स्तरावर हा निर्णय येत्या २ ते ३ दिवसांत घेतला जाईल. त्यानंतर तातडीनं परीक्षा घेतल्या जातील, अशी माहिती टोपेंनी दिली.

हायकोर्टाच्या कोरोनाबाधित न्यायमूर्तींना वेळेत उपचार नाहीत; VVIP रुग्णालयातही बेड न मिळाल्यानं मृत्यू

कोणत्या वर्गासाठी किती जागांची भरती केली जाईल, याचीदेखील माहिती राजेश टोपे यांनी दिली. क आणि ड वर्गातील १२ हजार जागा, ब वर्गातील डॉक्टर-मेडिकल ऑफिसर्सच्या २ हजार जागा आणि २ हजार स्पेशालिस्ट यांच्या जागा भरण्याचा निर्णय आपण घेत आहोत. त्याची शासन स्तरावरील कारवाई आठवड्याभरात पूर्ण होईल. त्यानंतर क आणि ड वर्गासाठी एजन्सीच्या माध्यमातून परीक्षा घेतली जाईल. आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांच्या माध्यमातून ब वर्गाच्या मुलाखती घेतल्या जातील. तर अ वर्गासाठीचे सिलेक्शन एमपीएससीकडे पाठवले जातील”, असं टोपेंनी सांगितलं.
 

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: maharashtra government to recruit 16 thousand persons in health department amid corona crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app