शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government : अजित पवारांची मनधरणी करण्यात पुन्हा अपयश; राष्ट्रवादीचे नेते माघारी परतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 14:41 IST

जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांच्या प्रयत्नांना अपयश

मुंबई: राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांची समजूत काढण्यात पक्षाला पुन्हा एकदा अपयश आलं आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवारांची भेट घेतली. मात्र त्यांची मनधरणी करण्यात दोन्ही नेते अपयशी ठरले. उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या अडचणी वाढल्या आहेत. काल सकाळी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तेव्हापासून राष्ट्रवादीकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्याप यामध्ये राष्ट्रवादीला यश आलेलं नाही. शरद पवारांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि अजित पवारांचे अनेक वर्षांचे विश्वासू सहकारी दिलीप वळसे पाटील यांना अजित पवारांची समजूत काढण्यासाठी पाठवलं होतं. मात्र दीड तासाच्या चर्चेनंतरही अजित पवारांची मनधरणी करण्यात पाटील यांना अपयश आलं. तत्पूर्वी काल राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनीही अजित पवारांची भेट घेतली. तटकरेंनी अजित पवारांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी रिकाम्या हातानं परतावं लागलं. तर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना स्वगृही परतण्यासाठी भावनिक साद घातली आहे. याशिवाय आमदार रोहित पवार यांनीदेखील फेसबुक पोस्टच्या माध्यमातून अजित पवार यांनी माघारी परतण्याचं आवाहन केलं आहे. लवकरच महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत येईल. पण यात हक्काची माणसं दुरावू नयेत, अशा शब्दांमध्ये रोहित पवार यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारJayant Patilजयंत पाटील