सीमाप्रश्नावर महाराष्ट्र सरकार बघ्याच्या भूमिकेत; मुंबईमध्ये काळा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 11:47 AM2018-11-01T11:47:57+5:302018-11-01T13:51:40+5:30

बेळगाव, बिदर, भालकीसह सीमाभाग कर्नाटकात डांबला गेल्याविरोधात आज 1 नोव्हेंबरला काळा दिवस म्हणून पाळण्यात आला.

Maharashtra government not taking contribution in border dispute; Black Day in Mumbai | सीमाप्रश्नावर महाराष्ट्र सरकार बघ्याच्या भूमिकेत; मुंबईमध्ये काळा दिवस

सीमाप्रश्नावर महाराष्ट्र सरकार बघ्याच्या भूमिकेत; मुंबईमध्ये काळा दिवस

Next

मुंबई : बेळगाव, बिदर, भालकीसह सीमाभाग कर्नाटकात डांबला गेल्याविरोधात आज 1 नोव्हेंबरला काळा दिवस म्हणून पाळण्यात आला. यावेळी सीमा संघर्ष समन्वय समिती आणि मराठी संघटनेच्या वतीने करी रोड नाका येथे कर्नाटक सरकारविरोधात काळे झेंडे दाखविण्यात आले. 


यावेळी जमलेल्या मराठी बांधवांनी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देतानाच कर्नाटक सरकारकडून सतत होणाऱ्या अन्यायावर महाराष्ट्र सरकार बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच केंद्र सरकारने दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून ताबडतोब सीमाप्रश्न निकालात काढावा, अशी मागणीही करण्यात आली.

Web Title: Maharashtra government not taking contribution in border dispute; Black Day in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.