शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government: बंगल्यावर बसून आदेश देणं वेगळं, आता उत्तरं द्यायची आहेत; नितेश राणेंचं उद्धव ठाकरेंना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 13:00 IST

महाराष्ट्रातल्या सत्तास्थापनेला अखेर मुहूर्त मिळाला असून, लवकरच राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होणार आहे.

मुंबईः महाराष्ट्रातल्या सत्तास्थापनेला अखेर मुहूर्त मिळाला असून, लवकरच राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होणार आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस व मित्रपक्षांच्या महाआघाडीचं सरकार येणार असून, भाजपाला विरोधी पक्षात बसावं लागणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर नारायण राणेंचं सुपुत्र आणि भाजपाचे आमदार नितेश राणेंनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. मला अभिमान आहे की ज्या पक्षाकडून मी आमदारकीची शपथ घेतलेली आहे, त्या पक्षानं सत्तेसाठी लाचारी केली नाही. जेव्हा आमच्याकडे समर्थन नव्हतं, तेव्हा आमचे नेते फडणवीसांनी सांगितलं की, सत्ता स्थापन करू शकत नाही. त्याच्यासाठी फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये मीटिंग घेतली नाही. लोकांचे तळवे चाटले नाहीत म्हणून मला अभिमान आहे की भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे, असं म्हणत त्यांनी नाव न घेता शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.विधिमंडळ आणि मुख्यमंत्रीची खुर्ची थोडी वेगळी आहे. बंगल्यात बसून आदेश देणं सोपं असतं. विधिमंडळात प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात आणि ती अधिकृत द्यावी लागतात. सभागृहात काय होणार आहे लवकरच कळेल. घोडामैदान तयार आहे आणि प्रत्येक प्रश्न हा महाराष्ट्राच्या हक्कासाठी विचारू. आम्ही महाराष्ट्राला न्याय मिळवून देऊ, एवढं मी तुम्हाला नक्की सांगतो. महाराष्ट्राच्या जनतेला आमच्याकडून फार अपेक्षा आहेत. समोर सत्तेत बसलेली लोकं जनतेला न्याय मिळवून कसा देणार आहेत, त्याची उत्तर त्यांना आम्हाला द्यावी लागणार आहेत. पहिला सातबारा कोरा करावा लागेल. शिवस्मारक बनवावं लागेल.पहिल्या दिवसापासूनच आमचा गोळा बारूद तयार आहे. आता फक्त मैदानात या, असं आव्हानच त्यांनी शिवसेनेला दिलं आहे. अजित पवारांनी पुन्हा राष्ट्रवादीत परतण्यावर ते म्हणाले, कुठलंही कुटुंब तुटता कामा नये. पवार कुटुंब त्या निमित्तानं एकत्र झालेलं आहे, मला त्याचं समाधान आहे. त्याचा आनंद आहे. राजकारण एका बाजूला आहे. पण एक कुटुंब एकसंध राहत असेल, तर त्यासारखं दुसरं समाधान नाही. पहिलं अधिवेशन कधी लागतंय याची मी वाट पाहतो आहे, असंही ते म्हणाले आहेत. 

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे