शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra CM: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार?; थोड्याच वेळात पत्रकार परिषद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 14:59 IST

Maharashtra CM Devendra Fadnavis : बहुमताची जुळवाजुळव होत नसल्यानं राजीनामा देण्याची शक्यता

मुंबई: राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यानंतर आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी त्यांच्याकडून राजीनाम्याची घोषणा केली जाऊ शकते. सर्वोच्च न्यायालयानं भाजपाला उद्या विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र त्याआधीच फडणवीस मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. विश्वासदर्शक ठरावावरील मतदान जास्तीत जास्त दिवस टाळण्याचा प्रयत्न भाजपाकडून सुरू होता. मात्र सर्वोच्च न्यायालयानं उद्या ५ वाजता बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले. बहुमत चाचणीवेळी खुलं मतदान घ्या आणि या चाचणीचं थेट प्रक्षेपण करण्याचे आदेशही न्यायालयानं दिले आहेत. त्यामुळे आता बहुमताची जुळवाजुळव करण्यासाठी भाजपाकडे जवळपास २६ तासांचा अवधी आहे. मात्र इतक्या कमी वेळात बहुमताचा आकडा गाठण्यासाठी आमदारांची जुळवाजुळव करणं अतिशय कठीण आहे. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस राजीनामा देऊ शकतात.शनिवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्याचवेळी अजित पवार यांनी बंडखोरी करत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांसोबत राष्ट्रवादीतील अनेक आमदार बाहेर पडतील, असा भाजपामधील अनेकांचा अंदाज होता. मात्र अजित पवारांच्या शपथविधीवेळी उपस्थित असणारे जवळपास सर्वच आमदार पुन्हा राष्ट्रवादीत परतले. त्यामुळे बहुमताचा आकडा गाठणं भाजपासाठी अवघड झालं. त्यातच सर्वोच्च न्यायालयानं उद्याच बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिल्यानं भाजपाला धक्का बसला आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस