शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government: अजित पवार ट्रायडंट हॉटेलमध्ये पोहोचले; नेमकी कोणाची भेट घेणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 08:40 IST

अजित पवारांच्या हालचालींकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष

मुंबई: राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार ट्रायडंट हॉटेलमध्ये पोहोचले आहेत. अजित पवार हॉटेलमध्ये कोणाची भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत, याची माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. मात्र राज्यात सध्या सुरू असलेला संघर्ष पाहता अजित पवार यांच्या हालचालींकडे सगळ्यांचं लक्ष आहे. अजित पवारांची समजूत काढण्यासाठी ट्रायडंट हॉटेलमध्ये राष्ट्रवादीचा एखादा वरिष्ठ नेता येऊ शकतो.  आज सकाळी अजित पवार त्यांच्या प्रेम कोर्ट निवासस्थानाहून निघाले. थोड्याच वेळात ते ट्रायडंट हॉटेलमध्ये पोहोचले. अजित पवार यांची ही भेट पूर्वनियोजित नव्हती. ते ट्रायडंटमध्ये एकटेच पोहोचले. सध्या राष्ट्रवादीकडून अजित पवारांची समजूत काढण्याचे प्रयत्न होत आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ यांनी अजित पवारांची मनधरणीचे प्रयत्न केले. मात्र त्यात त्यांना यश आलेलं नाही. याच पार्श्वभूमीवर भेटीगाठींसाठी अजित पवार ट्रायडंटला पोहोचले का, याची चर्चा सुरू आहे.ट्रायडंटवरुन अजित पवार पोलीस जिमखान्यात जाणार आहेत. तिथे २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना ते श्रद्धांजली अर्पित करतील. मात्र त्याआधी अजित पवार ट्रायडंटमध्ये पोहोचल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. जवळपास अर्धा तास अजित पवार ट्रायडंटमध्ये आहेत. काल सर्वोच्च न्यायालयात राज्यातील सत्ता संघर्षावर महत्त्वपूर्ण सुनावणी होती. त्याआधी छगन भुजबळ यांनी अजित पवारांची भेट घेतली होती. आज न्यायालयात अंतिम सुनावणी आहे. त्यामध्ये बहुमत चाचणी कधी घ्यायची याचा निर्णय होऊ शकतो.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा