शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government: राष्ट्रवादीचे नेते म्हणताहेत, 'परत या'; पण अजित पवारांनी थेट गाठलं 'वर्षा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 13:02 IST

राष्ट्रवादी, पवार कुटुंबाकडून अजित पवारांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू

मुंबई: राष्ट्रवादीतून बंडखोरी करत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या अजित पवारांची समजूत काढण्याचे प्रयत्न पक्षाकडून सुरू आहेत. त्यांच्या मनधरणीसाठी पवार कुटुंबानंदेखील प्रयत्न सुरू केले आहेत. राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनीही अजित पवारांना भावनिक साद घालत त्यांना स्वगृही परतण्याचं आवाहन केलं. मात्र अजित पवार भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीसाठी वर्षावर निघून गेले. त्यामुळे अजित पवार राष्ट्रवादीत परतण्याची शक्यता धूसर झाली आहे. शनिवारपासून राष्ट्रवादीकडून अजित पवारांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रफुल पटेल, छगन भुजबळ यांनी अजित पवारांना राष्ट्रवादीत परतण्याचं आवाहन केलं. याशिवाय पवार कुटुंबीयांकडूनही अजित पवारांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्याकडून अजित पवारांचे समजूत काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत. याशिवाय शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झाल्याचीदेखील शक्यता आहे. राष्ट्रवादीचे नेते, पवार कुटुंबाकडून मनधरणीचे प्रयत्न सुरू असताना अजित पवार थेट वर्षावर पोहोचले. विधानसभेत उद्याच बहुमत चाचणी घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिल्याच्या पार्श्वभूमीवर वर्षावर भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि मुख्य सचिव उपस्थित होते. या बैठकीनंतर अजित पवार त्यांचे बंधू श्रीनिवास पवार यांच्या निवासस्थानी गेले आहेत. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसprafull patelप्रफुल्ल पटेलChagan Bhujbalछगन भुजबळ