Maharashtra Government : 'हम होंगें कामयाब!', राष्ट्रवादी प्रचंड आशावादी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 10:21 AM2019-11-25T10:21:43+5:302019-11-25T10:34:34+5:30

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यांच्या मनधरणीचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

Maharashtra Government nawab malik tweet on Maharashtra Government formation | Maharashtra Government : 'हम होंगें कामयाब!', राष्ट्रवादी प्रचंड आशावादी

Maharashtra Government : 'हम होंगें कामयाब!', राष्ट्रवादी प्रचंड आशावादी

Next
ठळक मुद्देराष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एक सूचक विधान केलं आहे. राष्ट्रवादी अद्यापही शिवसेना आणि काँग्रेसलासोबत घेऊन सरकार स्थापन करण्यासंबंधी सकारात्मक असल्याचं म्हटलं आहे. नवाब मलिक यांनी सोमवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक शेर शेअर केला

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार यांना सोबत घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी स्थापन केलेल्या सरकारला विधानसभेत तोंडघशी पाडण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी जोरदार तयारी केली आहे. याच दरम्यान राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एक सूचक विधान केलं आहे. 'हम होंगे कामयाब!' म्हणत मलिक यांनी राष्ट्रवादी अद्यापही शिवसेना आणि काँग्रेसलासोबत घेऊन सरकार स्थापन करण्यासंबंधी सकारात्मक असल्याचं म्हटलं आहे. 

नवाब मलिक यांनी सोमवारी (25 नोव्हेंबर) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक शेर शेअर केला आहे. 'अगर फलक को जिद है बिजलियाँ गिराने की, तो हमें भी जिद है वहीं पर आशियाँ बसाने की ... हम होंगे कामयाब!' असं ट्विट मलिक यांनी केलं आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यांच्या मनधरणीचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे-पाटील, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ यांनी अजित पवारांना भेटून त्यांचं मन वळविण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ते अपयशी ठरले. 

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनीही अजित पवारांना परत येण्याचं आवाहन केलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता छगन भुजबळ अजित पवारांची मनधरणी करण्यासाठी गेले असून, अजित पवारांचं मन वळविण्यात त्यांना यश मिळतं की नाही हे थोड्याच वेळात समजणार आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 54 पैकी 52 आमदारांचं समर्थन मिळाल्याची चर्चा आहे. हरयाणातल्या गुरुग्राममधून राष्ट्रवादीच्या 4 आमदारांना मुंबईत आणण्यात आलं आहे. सर्व चारही आमदार भाजपाच्या ताब्यात होते, असा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. 

अनिल पाटील, बाबासाहेब पाटील, दौलत दरोडा आणि नरहरी जिरवार हे चार आमदार अजितदादा समर्थक असल्याचं बोललं जात आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 54 पैकी 52 आमदारांचं समर्थन मिळाल्याची चर्चा आहे. हरयाणातल्या गुरुग्राममधून राष्ट्रवादीच्या 4 आमदारांना मुंबईत आणण्यात आलं आहे. सर्व चारही आमदार भाजपाच्या ताब्यात होते, असा आरोप राष्ट्रवादीनं केला आहे. अनिल पाटील, बाबासाहेब पाटील, दौलत दरोडा आणि नरहरी जिरवार हे चार आमदार अजितदादा समर्थक असल्याचं बोललं जात आहे.

महाविकासआघाडीकडून सत्ता स्थापनेची तयारी सुरू असताना राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांनी भाजपासोबत जात थेट उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला. यावर आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाष्य केलं. अजित पवारांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय पक्षाकडून घेतला जाईल. एक व्यक्ती हा निर्णय घेणार नाही, असं शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं. 

 

Web Title: Maharashtra Government nawab malik tweet on Maharashtra Government formation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.