शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government: राष्ट्रवादी आमदार दौलत दरोडा, अनिल पाटीलही परतले; आपल्यासोबत काय-काय घडले ते सांगितले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 14:48 IST

राष्ट्रवादीच्या दोन आमदारांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

मुंबई: राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांच्या शपथविधीला उपस्थित राहणारे १३ पैकी १२ आमदार स्वगृही परतले आहेत. यापैकी दौलत दरोडा आणि अनिल पाटील यांनी त्यांची आपबिती प्रसारमाध्यमांसमोर मांडली. आम्ही दोन दिवसांपासून गायब होतो, अशा अफवा पसरवल्या जात आहेत. आम्हाला फुटीर आमदार म्हटलं जातं आहे. मात्र आम्ही शरद पवारांसोबत आहोत आणि यापुढेही कायम राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली. दौलत दरोडा आणि अनिल पाटील प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शनिवारपासून त्यांच्यासोबत नेमकं काय काय घडलं, याची माहिती दिली. 'शनिवारी अजित पवार यांनी आम्हाला बोलावलं होतं. ते आमचे नेते होते, आहेत आणि यापुढेही राहतील. त्यांनी आम्हाला आदेश दिला की सकाळी ७ वाजता भेटायचं आहे. त्यानंतर आम्ही राज्यपालांकडे गेलो. त्याठिकाणी शपथविधी आटोपला. राष्ट्रवादी आणि भाजपाचं सरकार स्थापन होऊ शकतं, असा संदेश आम्हाला आला होता. बाकीचे आमदार नंतर येतील. आता आपण सगळ्यांनी निघायचं आहे, असा निरोप आम्हाला मिळाला होता. त्यामुळे आम्ही राजभवनात शपथविधीसाठी गेलो', असं अनिल पाटील यांनी सांगितलं. शपथविधी आटोपल्यानंतर आम्हाला दिल्लीला नेण्यात आलं. मात्र संध्याकाळी आम्हाला प्रसिद्धीमाध्यमांकडून काही गोष्टींची माहिती समजली, असं पाटील म्हणाले. 'माध्यमांमधील बातम्या पाहून आम्ही शरद पवारांना फोन केला. आपल्याला काँग्रेस, शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करायची आहे. पक्ष त्यावर ठाम आहे, असं शरद पवार यांनी आम्हाला सांगितलं. त्यानंतर आम्ही त्यांना आमची परिस्थिती सांगितली आणि सुटकेची व्यवस्था करण्याची विनंती केली,' असं पाटील यांनी म्हटलं. दिल्लीतून निघताना बऱ्याच अडचणी आल्या. आम्हाला ज्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं होतं, तिथे भाजपाचे १००-२०० कार्यकर्ते होते. पोलिसांच्या गाड्या होत्या. साध्या वेशातले पोलीसदेखील होते. त्यामुळे आम्ही घाबरलो. सुटका कशी होणार हा प्रश्न पडला होता. पण पवारांनी आमची तिथून सुटका केली, अशा शब्दांत पाटील यांनी त्यांची आपबिती सांगितली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवार