शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government: होय, मीच राष्ट्रवादी; अजित पवारांच्या वकिलाच्या युक्तिवादानं कोर्टात हशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 13:08 IST

वकिलाच्या युक्तिवादानं न्यायालयात एकच हशा

नवी दिल्ली: देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या सरकारला विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचा आदेश द्यायचा का व द्यायचा असेल, तर या शक्तिप्रदर्शनासाठी किती दिवसांचा अवधी द्यायचा यावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. यावेळी न्यायालयानं दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकला. आता या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या अंतिम सुनावणी होणार आहे.राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांनी राज्यपालांना दिलेल्या पत्राचा विषय सर्वोच्च न्यायालयात चर्चेत राहिला. राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते म्हणून अजित पवारांनी राज्यपालांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या ५४ आमदारांचं पत्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिलं. राष्ट्रवादीच्या वतीनं देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देत असल्याचा उल्लेख या पत्रात होता. ते पत्र आज न्यायालयात सादर करण्यात आलं.भाजपाच्या वतीनं सादर करण्यात आलेल्या पत्राला काँग्रेस, राष्ट्रवादीच्या वकिलांनी जोरदार आक्षेप घेतला. त्या पत्रावर ५४ आमदारांच्या सह्या असतीलही, पण भाजपाला पाठिंब्याचा उल्लेखच नाही, असा युक्तिवाद राष्ट्रवादीच्या वतीनं करण्यात आला. एका कारणासाठी घेतलेलं पत्र अजित पवारांनी दुसऱ्या कारणासाठी वापरलं, अशी बाजू काँग्रेस, राष्ट्रवादीचे वकील अभिषेक मनू सिंघवींनी मांडली.अजित पवार यांच्या वतीनं मणींदर सिंग यांनी बाजू मांडली. अजित पवारांनी ५४ आमदारांच्या स्वाक्षऱ्या असलेलं पत्र राज्यपालांना दिलं. त्यांनी राष्ट्रवादीच्या वतीनं हे पत्र राज्यपालांकडे सुपूर्द केलं, असा युक्तिवाद त्यांनी केला. मीच राष्ट्रवादी आहे. होय, मीच राष्ट्रवादी आहे, असंदेखील मणींदर सिंग अजित पवारांच्या वतीनं म्हणाले. त्यानंतर न्यायालयात एकच हशा पिकला.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस