Maharashtra CM Swearing-in Ceremony Live: "मी एकनाथ संभाजी शिंदे...," एकनाथ शिंदे यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ
LIVE
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 19:38 IST2022-06-30T07:47:46+5:302022-06-30T19:38:53+5:30
Shiv Sena rebel leader Eknath Shinde will take oath as chief minister of Maharashtra : शिवसेनेचे प्रबळ नेते एकनाथ ...

Maharashtra CM Swearing-in Ceremony Live: "मी एकनाथ संभाजी शिंदे...," एकनाथ शिंदे यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ
Shiv Sena rebel leader Eknath Shinde will take oath as chief minister of Maharashtra : शिवसेनेचे प्रबळ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यामुळे राज्यात सुरू झालेला सत्ता संघर्ष आता नव्या वळणावर येऊन ठेपला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल मुख्यमंत्रीपदासह विधानसभा परिषदेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडीच वर्षातच कोसळलं आहे. गेल्या १० दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर अखेर उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे पडदा पडला आहे.
Shiv Sena Rebel Leader Eknath Shinde will be the next chief minister of Maharashtra
LIVE
08:26 PM
फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणं आश्चर्याचा धक्का - शरद पवार
जे मुख्यमंत्री होते, ५ वर्ष ज्यांनी काम केलं. नंतर त्यांनी विरोधी पक्षाचं नेतृत्व ज्यांनी केलं, त्यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यावी लागली हा आश्चर्याचा धक्का होता. एकदा आदेश झाला आणि सत्तेच्या खुर्चीची संधी मिळाली तर स्वीकाराची असते याचं उदाहण फडणवीसांनी घालून दिलंय. - शरद पवार
07:41 PM
देवेंद्र फडणवीस यांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ
देवेंद्र फडणवीस यांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ.
Mumbai: Devendra Fadnavis takes oath as the Deputy Chief Minister of Maharashtra pic.twitter.com/UM5XmxBCPZ
— ANI (@ANI) June 30, 2022
07:36 PM
एकनाथ शिंदे यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ
एकनाथ शिंदे यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. राजभवनात पार पडला शपथविधी सोहळा...
#थेटप्रसारण:-
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) June 30, 2022
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून @mieknathshinde यांचा राजभवन येथे थपथविधी होत आहे. राज्यपाल @BSKoshyari हे श्री. शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची शपथ देत आहेत.#Livehttps://t.co/yy2EUlM9OC
07:04 PM
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होणार
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होणार. अमित शाह यांनी ट्वीट करत दिली सरकारमध्ये सामील होणार असल्याची माहिती.
भाजपा अध्यक्ष श्री @JPNadda जी के कहने पर श्री @Dev_Fadnavis जी ने बड़ा मन दिखाते हुए महाराष्ट्र राज्य और जनता के हित में सरकार में शामिल होने का निर्णय लिया है।
— Amit Shah (@AmitShah) June 30, 2022
यह निर्णय महाराष्ट्र के प्रति उनकी सच्ची निष्ठा व सेवाभाव का परिचायक है। इसके लिए मैं उन्होंने हृदय से बधाई देता हूँ।
06:41 PM
लगेच प्रतिक्रिया देण्यासारखं काही नाही - मनिषा कायंदे
देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे. यावर लगेचच बोलण्यासारखं काही नाही. पुढे कसं काय होतंय ते पाहू. हे थोडं अनपेक्षित होतं, पण लगेच काही प्रतिक्रिया माझ्याकडे आहे असं वाटत नाही - मनिषा कायंदे
05:03 PM
एक मजबूत सरकार राज्याला देणार - शिंदे
एक मजूबत सरकार लोकांना मिळेल. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणार. एक मजबूत सरकार राज्याला देणार - शिंदे
05:02 PM
आमदारांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही - शिंदे
सर्व ५० आमदारांनी जी लढाई लढलीये, वैचारिक भूमिका घेऊन, बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची भूमिका घेऊन. धर्मवीरा आनंद दिघेंची शिकवण आहे, अन्यायाला वाचा फोडण्याचं काम केलंय. त्यांनी जो विश्वास दाखवलाय त्याला कदापि तडा जाऊ दिला जाणार नाही.
05:00 PM
बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पाठिंबा दिल्याबद्दल फडणवीसांचे मनापासून त्यांचे आभार - शिंदे
बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पाठिंबा दिल्याबद्दल फडणवीसांचे मनापासून त्यांचे आभार. फडणवीसांनी मोठेपणा दाखवला. मोठं संख्याबळ त्यांच्याकडे आहे. मुख्ममंत्री पद त्यांनाही घेता आलं असतं. पण मनाचा मोठेपणा दाखवून बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना पाठिंबा दिला. - शिंदे
04:54 PM
महाविकास आघाडीत काही निर्णय घेता येत नव्हते - शिंदे
राज्याच्या हिताच्या आणि भविष्याच्या दृष्टीनं जे घडत होतं, मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांवर झालेली कारवाई होते. महाविकास आघाडीत काही निर्णय घेता येत नव्हते. आता काही निर्णय झाले त्याचं स्वागत, महाविकास आघाडीमुळे काही मर्यादा असतील - शिंजे
04:53 PM
आमदारांच्या मनात नाराजी होती - शिंदे
गेल्या काळात आम्ही अनेकदा मुख्यमंत्र्यांना सर्व माहिती दिली. मी देखील त्यांच्यासोबत चर्चा केली. नैसर्गिक युती होती. पण महाविकास आघाडी तयार झाली. आमदारांच्या मनात जी नाराजी होती, निवडणुकांती येणाऱ्या अडचणी येणार ते लक्षात घेऊन, कोणताही स्वार्थ मनात ठेवला नाही.
04:51 PM
राज्याच्या विकास हा अजेंडा ठेवून आम्ही पुढे निघालो - एकनाथ शिंदे
आमदारांच्या मतदार संघाची विकास कामं, राज्याच्या विकास हा अजेंडा ठेवून आम्ही पुढे निघालो आहोत. शिवसेना पक्ष म्हणून जी कायदेशीर पक्रिया आहे, ५० आमदार आम्ही एकत्र आहोत. - शिंदे
04:47 PM
हिंदुत्त्ववादी विचारांचं सरकार येणार - फडणवीस
पुन्हा एकदा हिंदुत्त्ववादी विचारांचं, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मांडलेलं हिंदुत्व, भाजपाचे जे राष्ट्रीयत्व मांडतंय, मोदींनी जे व्हिजन दाखवलंय, ते व्हीजन पुढे नेणारं सरकार - फडणवीस
04:45 PM
आम्ही सत्तेच्या पाठीमागे नाही - फडणवीस
आम्ही सत्तेच्या पाठीमागे नाही. मुख्यमंत्रिपदाकरिता काम करत नाही आहोत. ही तत्त्वाची, विचारांची लढाई. म्हणून भाजपाने हा निर्णय केला की, एकनाथ शिंदे यांना भाजपा समर्थन देईल. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील - फडणवीस
04:42 PM
सरकारच्या बाहेर असेन, पण समर्थन - फडणवीस
शिवसेनेचे शिंदे साहेबांसोबत असलेले आणि भाजपाचे लोक मंत्रिमंडळात येतील. मी स्वतः बाहेर असेन, पण पूर्णपणे हे सरकार योग्य प्रकारे चाललं पाहिजे ही जबाबदारी माझीही असेल. त्यासाठी पूर्ण साथ आणि समर्थन मी देणार - फडणवीस
04:38 PM
आम्ही पदासाठी काम करत नाही, तत्वांची, हिंदुत्वाची लढाई आहे - फडणवीस
तेव्हाही मी सांगायचो आम्ही अल्टरनेट सरकार देऊ. आम्ही लोकांच्या डोक्यावर निवडणुका लादणार नाही. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा विधीमंडळ गट, भाजपचा विधीमंडळ गट आणि अपक्ष आणि छोट्या पक्षांचे लोक एकत्र आले आणखीही लोक येतायत. आम्ही पदासाठी काम करत नाही, तत्वांची, हिंदुत्वाची लढाई आहे - फडणवीस
04:36 PM
तो त्यांचा अंतर्गत प्रश्न - फडणवीस
राष्ट्रवादीसोबत राहायला तयार नाही असं सांगण्यात आलं. पण उद्धव ठाकरेंनी आमदारांऐवजी काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना जास्त प्रेफरन्स दिला. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न - फडणवीस
04:35 PM
राज्यपालांचं पत्र आल्यावर कॅबिनेट घेता येत नाही - फडणवीस
शेवटचं संभाजीनगर झालं. जो पर्यंत विश्वासमत होत नाही, तोवर कॅबिनेट घेता येत नाही. पण त्यांनी ती घेऊन संभाजीनगर, धाराशिव, दी.बा पाटील असे निर्णय झाले. ते वैध मानले जाणार नाही. पण आम्ही ते निर्णय पुन्हा घेऊ. आमचा पाठिंबा आहे - फडणवीस
04:32 PM
कामांना स्थगिती, प्रचंड भ्रष्टाचार पाहिला मिळाला. महाराष्ट्राच्या इतिहासात दोन मंत्री हे भ्रष्टाचारासाठी जेलमध्ये जाणं खेदजनक बाब होती - फडणवीस
04:31 PM
तेव्हाचे आमचे मित्र आणि शिवसेनेचे नेते यांनी वेगळा निर्णय घेतला होता - फडणवीस
तेव्हाचे आमचे मित्र आणि शिवसेनेचे नेते यांनी वेगळा निर्णय घेतला. बाळासाहेबांनी आजन्म ज्यांचा विरोध केला, ज्यांनी हिंदुत्वाच्या विचाराचा, सावरकरांचा विरोध केला अशा काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती केली आणि भाजपला बाहेर ठेवलं. जनतेनं मत भाजप सेना युतीला दिलं होतं. त्याचा अपमान करण्यात आला - फडणवीस
04:29 PM
भाजप शिवसेना युतीचं सरकार येईल अशी अपेक्षा होती - फडणवीस
२०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना ५६ जागा जिंकली. एकूण १६१ आणि अपक्ष मिळून १७० लोकं निवडून आले होते. भाजप शिवसेना युतीचं सरकार येईल अशी अपेक्षा होती - फडणवीस
03:28 PM
नव्या सरकारचा आजच शपथविधी
राजभवनात आज संध्याकाळी ७ वाजता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा होणार आहे.
03:19 PM
शिंदे मुंबईत दाखल होताच समर्थकांना केलं अभिवादन
VIDEO: मुंबईत पोहोचताच विमानतळावर उपस्थित समर्थकांना एकनाथ शिंदेंनी केलं अभिवादन pic.twitter.com/aFQq3R1b6L
— Lokmat (@lokmat) June 30, 2022
03:10 PM
राजभवनावर पत्रकार परिषद घेणार
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस राजभवनावर राज्यपालांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेणार आहेत.
03:07 PM
एकनाथ शिंदे फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचले
राज्यपालांची भेट घेण्याआधी एकनाथ शिंदे मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्या 'सागर' बंगल्यावर त्यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत.
03:04 PM
एकनाथ शिंदे मुंबईत पोहोचले
एकनाथ शिंदे मुंबईत पोहोचले असून ते राजभवनावर राज्यपालांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. यावेळी मुंबई विमानतळावर दाखल होताच एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना अभिवादन केलं. त्यानंतर मोठ्या फौजफाट्यासह ते राजभवनाच्या दिशेनं निघाले.
02:18 PM
BIG BREAKING: देवेंद्र फडणवीस आज संध्याकाळीच घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ?; भाजपामधील सूत्रांची माहिती
01:03 PM
"महाराष्ट्रानं ज्यांना कौल दिला होता तेच आता एकत्र येणार आहेत. त्यामुळे संजय राऊतांनी खंजीर खुपसल्याची भाषा करू नये. त्यांनीच उलट जनतेच्या पाठीत खंजीर खुपसून शिवसेनेला राष्ट्रवादीसोबत जाण्याचा सल्ला दिला. ते अर्ध्याहून जास्त काम राष्ट्रवादीचच करतात"
- दीपक केसरकर
12:55 PM
संजय राऊत जेवढं कमी बोलतील तेवढं चांगलं आहे. आमदार तुम्हाला निवडून देत असतात आणि त्यांनाच तुम्ही किंमत देत नाही- दीपक केसरकर
12:50 PM
शिवसेनेचा गटनेता म्हणून माझी निवड झाली आहे. ५० आमदारांनी माझी निवड केली आहे- एकनाथ शिंदे
12:49 PM
मंत्रिपदाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. एकही आमदार मंत्रिपदाच्या आशेनं इथं आलेला नाही- दीपक केसरकर
12:48 PM
आम्ही घेतलेली भूमिका गेली दीड वर्ष ऐकून न घेतल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. नैसर्गिक सहकाऱ्यांसोबतच राहावं अशी आमची भूमिका होती. काँग्रेस-राष्ट्रवादीशी जवळीक आम्हाला पटलेली नव्हती- दीपक केसरकर
12:47 PM
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचं शिंदे गटातील आमदारांनी सेलिब्रेशन केलेलं नाही. त्याचं मन दुखवावं असा कोणताही हेतू नव्हता- दीपक केसरकर
12:38 PM
एकनाथ शिंदे आणि केसरकर मुंबईकडे रवाना
एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकर गोव्याहून मुंबईकडे रवाना झाले आहेत. राज्यपालांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
12:33 PM
काँग्रेस नेते 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला
काँग्रेस नेते बैठकीनंतर 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.
11:40 AM
उद्धव ठाकरेंनी विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जायला हवं होतं- बाळासाहेब थोरात
"मला वाटतं उद्धव ठाकरेंनी विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जायला हवं होतं, पण त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या शेवटी आपलं निरोपाचं भाषण दिलं. उद्धवजी हे साधे स्वभावाचे संवेदनशील व्यक्ती आहेत. त्यांना काही गोष्टी आवडल्या नाहीत म्हणून त्यांनी राजीनामा दिला", असं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले.
11:36 AM
देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी खलबतं
महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्या 'सागर' बंगल्यावर भाजपा नेत्यांची सत्तास्थापनेबाबत खलबतं सुरू असून राज्यातील भाजपाचे प्रमुख नेते बैठकीला उपस्थित आहेत.
11:34 AM
नितेश राणेंचं खोचक ट्विट, संजय राऊतांना केलं लक्ष्य
Ukhaad Diya!!!@rautsanjay61
— nitesh rane (@NiteshNRane) June 29, 2022
11:17 AM
भाजापासोबत कोणतीही चर्चा नाही- एकनाथ शिंदे
भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, लवकरच होईल. तोपर्यंत कृपया मंत्रिपदाच्या याद्या आणि याबाबत पसरलेल्या अफवा यावर विश्वास ठेवू नका.
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 30, 2022
10:41 AM
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावरील पोलीस बंदोबस्त वाढवला
मुंबईत शिवाजी पार्क येथील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरील पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. एकनाथ शिंदे गट आज मुंबईत येण्याची शक्यता असल्यामुळे पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
10:01 AM
आता शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार आहे का? त्यांना धुणीभांडीच करावी लागणार आहेत, असा टोला संजय राऊत यांनी शिंदे गटाला लागवला आहे.
10:00 AM
ईडीच्या चौकशीला सामोलं जाणार- संजय राऊत
उद्या दुपारपर्यंत ईडीच्या चौकशीला सामोरं जाणार, मी कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्यास तयार आहे, असं संजय राऊत म्हणाले
09:57 AM
...त्यांना माझ्या शुभेच्छा- संजय राऊत
ज्यांना सरकार पाडून दाखवण्याचं कंत्राट मिळालं होतं. त्यांनी ते पाडून दाखवलं. आता त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आहेत, असं संजय राऊत म्हणाले. तसंच ठाकरे परिवाराला सत्तेची लालसी कधीच नव्हती. पवारांनी विनंती केली म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते. आज जे विरोधात बोलत आहेत त्यांच्यापैकी अनेकांचं पालन पोषण शरद पवारांच्या नेतृत्त्वात झालं आहे.
09:29 AM
भाजपाने वरळीत लावलेले बॅनर युवासेनेनं उतरवले, संघर्षाची चिन्ह!
वरळी विधानसभेत भाजपाने लावलेले फडणवीसांच्या विजयाचे बॅनर युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी उतरवल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे परिसरात दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
08:28 AM
महाराष्ट्र माफिया मुक्त होत आहे, आता मुंबई महापालिकेची बारी- किरीट सोमय्या
महाराष्ट्र "माफिया" मुक्त होत आहे, आत्ता मुंबई महापालिका माफिया मुक्त करणार@BJP4Maharashtra
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) June 30, 2022
07:55 AM
शिंदे गटाची गोव्यात बैठक
ठाकरे सरकार कोसळल्यानंतर आज गोव्यात एकनाथ शिंदे गटाची महत्वाची बैठक होणार असून या बैठकीत पुढची रणनीती ठरवली जाणार आहे, अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली.
07:49 AM
महाविकास आघाडी सरकार कोसळलं, भाजपाच्या सत्तास्थापनेच्या हालचाली
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता भाजपानं सत्ता स्थापनेच्या हालचालींना सुरुवात केली आहे. सत्ता स्थापने संदर्भात भाजपाकडून आज महत्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.