Maharashtra Government : बुलेट ट्रेनऐवजी शेतकऱ्यांना प्राधान्य; महाविकास आघाडीची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2019 06:13 IST2019-11-23T03:05:33+5:302019-11-23T06:13:34+5:30
बुलेट ट्रेनऐवजी शेतकऱ्यांवर पैसा खर्च करण्याचा निर्णय

Maharashtra Government : बुलेट ट्रेनऐवजी शेतकऱ्यांना प्राधान्य; महाविकास आघाडीची भूमिका
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी सुमारे २५ हजार कोटी रुपये लागणार आहेत. त्यामुळे हा पैसा बुलेट ट्रेनऐवजी शेतकऱ्यांवर खर्च करण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या बैठकीत झाल्याचे समजते.
राज्यात ओला दुष्काळ असताना केवळ दोन शहरांना जोडणारी बुलेट ट्रेन राज्याला परवडणारी नाही अशी भूमिका सेना, काँग्रेस, राष्ट्रवादीने घेतली. दुष्काळ निवारणासाठी राज्याला ५० हजार कोटी रुपये लागतील. त्यासाठी केंद्राने आधी राज्याला मोठी मदत देण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रातून या बुलेटचा पूर्ण निधी द्यावा, असे आघाडीच्या नेत्यांचे म्हणणे आहे.