शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
2
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
3
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
4
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
5
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
6
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
7
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
8
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
9
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
10
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
11
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
12
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
13
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना
14
Viral Video: छोटा पॅकेट, बडा धमाका !! चिमुरडीने केला अफलातून डान्स, नेटकऱ्यांची जिंकली मनं
15
दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?
16
लव्ह ट्रँगलचा भयंकर शेवट! माजी लिव्ह-इन पार्टनरने केली गर्भवतीची हत्या, पतीने घेतला आरोपीचा जीव
17
जियोफायनान्सकडून डिजिटल गोल्ड खरेदीवर २% सोने मोफत; सोबत १० लाख रुपयांपर्यंतची बक्षिसेही
18
Mitchell Starc Bowling Speed : स्टार्कनं खरंच रोहितला 'वर्ल्ड रेकॉर्ड' सेट करणारा वेगवान चेंडू टाकला?
19
IND vs AUS 1st ODI : गिलनं साधला मोठा डाव! महेंद्र सिंह धोनीचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड मोडला
20
Parineeti Chopra : परिणीती चोप्रा-राघव चड्ढा झाले आईबाबा, अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्याचे आगमन

Maharashtra Government: राष्ट्रवादीनं राज्यपालांना पत्र पाठवलं, काँग्रेसला नाही समजलं; महाआघाडीतील गोंधळ उघड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2019 16:39 IST

पुन्हा दिसला काँग्रेस, राष्ट्रवादीतील समन्वयाचा अभाव

मुंबई: भाजपा, शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यात अपयश आल्यानंतर राज्यपालांनी काल राष्ट्रवादीला सरकार स्थापनेचा दावा करण्याची संधी दिली. त्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादीला २४ तासांची मुदत दिली होती. मात्र ती मुदत संपण्याआधीच राष्ट्रवादीनं राज्यपालांना पत्र लिहिलं. राज्यपालांनी मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीनं केली होती. मात्र राज्यपालांनी राष्ट्रवादीची मागणी फेटाळली. मात्र या सर्व घडामोडींपासून काँग्रेस अनभिज्ञ होती. त्यामुळे महाआघाडीतल्या दोन मोठ्या पक्षांमधील समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा दिसून आला.शिवसेनेला पाठिंबा देण्यावरुन काँग्रेस, राष्ट्रवादीमधील मतभेद समोर आले होते. यानंतर आज पुन्हा एकदा दोन्ही काँग्रेसमध्ये फारसा समन्वय नसल्याचं चित्र दिसलं. राष्ट्रवादीला राज्यपालांनी दिलेली मुदत आज रात्री ८.३० वाजता संपणार आहे. मात्र सत्ता स्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ नसल्यानं दोन दिवस वाढवून द्यावेत, अशा विनंतीचं पत्र राष्ट्रवादीनं सकाळीच राज्यपालांना दिलं. मात्र याबद्दल काँग्रेसला कोणतीही कल्पना नव्हती. शिवसेनेनं पुरेसं संख्याबळ नसल्यानं काल रात्री राज्यपालांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना राजभवनावर बोलावलं. राज्यपालांनी राष्ट्रवादीला बहुमताचा दावा करण्यासाठी २४ तासांचा अवधी दिला. राज्यपालांनी रात्री साडे आठपर्यंतची मुदत राष्ट्रवादीला दिली होती. ती मुदत संपेपर्यंत राष्ट्रवादीने जर पत्र दिलं नसतं तर, राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली नसती. त्यामुळे घेऊन केंद्र सरकारनं पुढील कार्यवाही करण्याचा प्रश्नच आला नसता.आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशाबाहेर जायचं होतं. त्याआधी निर्णय घेण्यासाठी दिल्लीत घाई होती. जर आज रात्री साडे आठपर्यंत राष्ट्रवादीनं काहीच कळवलं नसतं, तर राज्यपालांना केंद्रालाही माहिती देता आली नसती. परिणामी आजची केंद्रातली दुपारची तातडीची बैठक झाली नसती. पण राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते अजित पवार यांच्या स्वाक्षरीचं पत्र राजभवनावर दुपारी देण्यात आलं. ते पत्र हाती येताच राज्यपालांनी त्यावर तातडीनं कार्यवाही केली. हे पत्र दिल्याची कसलीही माहिती काँग्रेसला नव्हती. त्यामुळे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी राष्ट्रवादीला दिलेली मुदत संपण्याआधीच राष्ट्रपती राजवटीची शिफारस करणं घटनाविरोधी असल्याचं ट्विट केलं. मात्र आता हे पत्र राष्ट्रवादीकडून देण्यात आल्याची माहिती समोर आल्यामुळे काँग्रेस नेतेही बुचकळ्यात पडले आहेत. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाAjit Pawarअजित पवार