शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

Maharashtra Government: …म्हणून भर विधानसभेतच अजितदादा जितेंद्र आव्हाडांवर भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 20:48 IST

विधानसभेत ठाकरे सरकारनं बहुमत सिद्ध केलेलं आहे.

मुंबईः विधानसभेत ठाकरे सरकारनं बहुमत सिद्ध केलेलं आहे. विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने 169 सदस्यांनी अनुकूल मत दिले. तर 4 सदस्य तटस्थ राहिले. ठरावाच्या विरोधात मतदानासाठी सभागृहात एकही सदस्य उपस्थित नव्हते. सदस्य अशोक चव्हाण यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला. त्याला सदस्य जयंत पाटील, नवाब मलिक, सुनील प्रभू यांनी अनुमोदन दिले. परंतु विश्वासदर्शक ठराव मांडत असताना अजित पवार हे जितेंद्र आव्हाडांवर संतापले आणि तोच चर्चेचा विषय ठरला आहे.त्याचं झालं असं की, विश्वासदर्शक ठरावावेळी प्रत्येक आमदाराच्या आसनाला ठरावीक अनुक्रमांक बहाल करण्यात येतो. त्याप्रमाणे विधानसभेतल्या प्रत्येक सदस्यानं विश्वासदर्शक ठरावावर मतदान करायचं असतं. विश्वासदर्शक ठरावाला पाठिंबा देण्यासाठी जागेवर उभं राहून आपलं नाव सांगत अनुक्रमांकाचा उल्लेख करावा लागतो. परंतु नाव आणि अनुक्रमांकाचा उल्लेख करताना बऱ्याचदा आमदारांनी गफलत होते. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडसुद्धा अशाच प्रकारे गोंधळून गेल्याचं पाहायला मिळाले.मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर ती गणती वर्षा गायकवाड यांच्यापर्यंत आली. त्यांनी आपला अनुक्रमांक 14 सांगत स्वतःचं नाव सांगितलं. त्यानंतर अॅड. के. सी. पाडवींनीसुद्धा स्वतःचा अनुक्रमांक 15 सांगत नाव सांगितले. जितेंद्र आव्हाडांचा नंबर आल्यानंतर त्यांची गल्लत झाली. जितेंद्र आव्हाडांनी आपलं नाव सांगत अनुक्रमांक 16 ऐवजी थेट 20 सांगितला. त्यानंतर सगळेच आश्चर्यचकीत झाले. हा प्रकार अजितदादांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी लागलीच आव्हाडांना तुमचा क्रमांक 20 नसून 16 आहे, असं सांगितलं.अजितदादांनी रागाच्या भरातच आव्हाडांना सर्वांसमक्ष सुनावले. आव्हाडांच्या शेजारी बसलेल्या हसन मुश्रीफांनीसुद्धा ही चूक आव्हाडांच्या ध्यानात आणून दिली. तसाच काहीसा प्रकार आमदार बालाजी कल्याणकर यांच्याबाबतही झालेला पाहायला मिळाला. त्यांना 100 अनुक्रमांक देण्यात आल्यानंतरही त्यांनी 78 असा उच्चारला. ही चूक लागलीच त्यांच्या शेजारी बसलेल्या आमदारांनी त्यांच्या लक्षात आणून दिली. पण आदित्य ठाकरे यांनी बहुमत चाचणीदरम्यान आपल्या नावाचा उल्लेख करताना आदित्य रश्मी उद्धव ठाकरे असं म्हटलं, तर अनुक्रमांक 25 असल्याचं नमूद केलं.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारJitendra Awhadजितेंद्र आव्हाडMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019