Maharashtra Garthla; Mumbai: 4.1.3 and snowflakes sheet in Mahabaleshwar | महाराष्ट्र गारठला; मुंंबई@११.४ तर महाबळेश्वरात हिमकणांची चादर

महाराष्ट्र गारठला; मुंंबई@११.४ तर महाबळेश्वरात हिमकणांची चादर

मुंबई/नाशिक/सातारा : उत्तरेकडील शीतलहरी आणि राज्यातील कोरड्या हवामानामुळे बहुतांश ठिकाणी किमान तापमानात घट झाली असून मुंबईसह राज्यभरात कडाक्याची थंडी पडली आहे. शुक्रवारी नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात २.४ अंश सेल्सिअस तापमान होते. गोदाकाठावरील गावांमध्ये तर दवबिंदू गोठले होते.

जिथे नेहमी घामाच्या धारा वाहतात, त्या मुंबईचे किमान तापमान आज ११.४ अंश नोंदविण्यात आले. सन २०१३ नंतर नोंदविण्यात आलेले हे सर्वात कमी किमान तापमान आहे. नववर्षाच्या प्रारंभापासूनच नाशिककर गुलाबी थंडीचा अनुभव घेत आहेत. गुरुवारपासूनच वाढत्या थंडीबरोबर गार वारेदेखील वाहू लागल्याने बोचरी थंडी जाणवू लागली आहे. प्रचंड थंडीचा द्राक्ष पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.

महाबळेश्वरमध्ये शुक्रवारी सकाळी वेण्णा जलाशय परिसरात हिमकणांचे दर्शन झाले. दवबिंदू गोठल्याने सर्वत्र पांढऱ्याशुभ्र हिमकणांची चादर पसरली होती. यंदाच्या हंगामात प्रथमच हिमकण पाहावयास मिळाले. लिंगमाळा परिसरातील स्ट्रॉबेरीच्या पानांवर तसेच गवतावर हिमकणांचा गालिचा पाहावयास मिळाला.

गारठलेली शहरे
(किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये)
निफाड (नाशिक) : २.४
जळगाव ७ । औरंगाबाद ८.१
पुणे ८.२ । अहमदनगर ९.२
महाबळेश्वर १० । सातारा १०.२
बुलडाणा ११.४ । मुंबई ११.४
नांदेड ११.५ । परभणी १२.७

Web Title: Maharashtra Garthla; Mumbai: 4.1.3 and snowflakes sheet in Mahabaleshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.