शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Political Crisis: पुढील टार्गेट काँग्रेस! माजी मुख्यमंत्री शिंदे गटात जाणार? अब्दुल सत्तारांनी घेतली भेट; हालचालींना वेग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 12:00 IST

Maharashtra Political Crisis: शिवसेना आणि राष्ट्रवादीनंतर आता शिंदे गटाचे पुढील टार्गेट काँग्रेस असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.

Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीच्या धक्क्यातून अद्यापही शिवसेना सावरताना दिसत नाही. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) एकामागून एक बैठकांचा सपाटा सुरू असून, आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) प्रचंड सक्रीय झाले आहेत. यातच एकनाथ शिंदे गटाला दिवसेंदिवस राज्यभरातून पाठिंबा वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे आता अन्य पक्षातूनही शिंदे गटात येणाऱ्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. यातच आता काँग्रेसमधील एक माजी मुख्यमंत्री शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. याचे कारण म्हणजे शिंदे गटातील कृषितमंत्री अब्दुल सत्तार यांची भेट.

अब्दुल सत्तार यांनी नांदेडमध्ये काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी बंद दाराआड झालेली बैठक सध्या राजकारणात चर्चेचा विषय बनली आहे. राजकीय वर्तुळात या बैठकीचे अनेक अर्थही काढले जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे सरकारच्या आढावा बैठकीला आल्यानंतर अब्दुल सत्तार हे अशोक चव्हाण यांना त्यांच्या निवासस्थानी भेटण्यासाठी गेले होते. ही बैठक सुमारे अर्धा तास चालली. विशेष म्हणजे यावेळी कुणालाच आत येऊ दिले नाही.

अब्दुल सत्तार यांनी दिली बैठकीबाबत माहिती

अब्दुल सत्तार यांनी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या. याबाबत बोलताना, अशोक चव्हाण यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायला गेलो होतो. अशोक चव्हाण यांना मराठवाडा आणि संपूर्ण महाराष्ट्राविषयी चांगले ज्ञान आणि समज आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांचीही त्यांना चांगली जाण आहे. त्यांचे आशीर्वाद घेण्यासोबतच मी कृषिमंत्री म्हणून माझे खाते सांभाळण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन घेईन, असे त्यांनी सांगितले. 

अशोक चव्हाण नाराज?

ही भेट शिष्टाचाराचा एक भाग असल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वी चव्हाण हे पक्षनेतृत्वावर नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली होती. एवढेच नाही तर एकनाथ शिंदे सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशीही ते सभागृहात गैरहजर होते. दरम्यान, अलीकडेच अस्लम शेख यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या बंगल्यावर भेट घेतली होती. या भेटीनंतर अस्लम शेख लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. एवढेच नाही तर त्यांच्यासोबत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचेही नाव समोर येत होते. हे दोन्ही नेते काँग्रेस सोडून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होऊ शकतात, असा दावा केला जात असल्याचे सांगितले जात आहे.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळAshok Chavanअशोक चव्हाणAbdul Sattarअब्दुल सत्तारEknath Shindeएकनाथ शिंदेNandedनांदेड