Maharashtra Rain Forecast: महाराष्ट्रात सध्या पुराने थैमान घातले आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पुढील तीन ते चार दिवस विदर्भात काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे प्रादेशिक हवामान खात्याने सांगितले आहे.
या काळात विदर्भातील तापमान आणखी कमी होणार आहे. पूर्व विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याचेही हवामान खात्याने सांगितले आहे.
तर यवतमाळ, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असून, आगामी तीन ते चार दिवस हवामान अस्थिर राहणार आहे. दरम्यान नागपूरसाठी पुढील दोन दिवसांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, असे प्रादेशिक हवामान खाते, नागपूरचे शास्त्रज्ञ प्रवीण कुमार यांनी सांगितले आहे.