Maharashtra Flood: अस्मानी संकट थांबेना, आणखी १५ दिवस पावसाचे; शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2021 06:54 AM2021-10-03T06:54:25+5:302021-10-03T06:54:39+5:30

उष्णतेतील वाढीला जमिनीतून मिळणारी आर्द्रता, त्यामुळे दुपारनंतर कम्युलस ढगांची निर्मिती होते.

Maharashtra Flood: Crisis will not stop, 15 more days of rain; Worrying news for farmers | Maharashtra Flood: अस्मानी संकट थांबेना, आणखी १५ दिवस पावसाचे; शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी

Maharashtra Flood: अस्मानी संकट थांबेना, आणखी १५ दिवस पावसाचे; शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी

Next

पुणे/मुंबई : मराठवाडा, विदर्भात पावसाचा धुमाकूळ सुरूच असून, गेले दोन-तीन दिवस ढगफुटीसारखा पाऊस पडत आहे. शनिवारी पहाटे औरंगाबादेत २५ मिनिटांत तब्बल ५१.२ मिमी एवढा पाऊस कोसळला. बीड, परभणी, श्रीगोंदा, चाळीसगाव येथेही मध्यरात्री पावसाने थैमान घातले.

उष्णतेतील वाढीला जमिनीतून मिळणारी आर्द्रता, त्यामुळे दुपारनंतर कम्युलस ढगांची निर्मिती होते. हे ढग उंचावर गेल्यावर त्यांना गारवा मिळून कमी वेळेत जोरदार पाऊस पडत असल्याचे ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले.
वातावरण बदलामुळे ऑक्टोबरच्या पहिल्या १५ दिवसांत असा पाऊस  पडतो. हा शेतीसाठी उपयोगी नसतो. डॉ. कुलकर्णी म्हणाले की, गेल्या काही वर्षांपासून परतीचा पाऊस लांबला आहे. आता ऑक्टोबरअखेर उजाडते.

काही वेळेस शहराच्या एका भागात जोरदार पाऊस तर इतर भागात पाऊस नसतो. मान्सूनची माघार लांबल्याने ऑक्टोबरचा पहिल्या १५ दिवसांत वादळी वाऱ्यासह जाेरदार पाऊस होत असतो. तसा तो सध्या होत आहे. अजून १५ दिवस असा पाऊस होऊ शकतो, असे डॉ. कुलकर्णी म्हणाले.

कम्युलस ढग कारणीभूत
ऑक्टोबरमध्ये सूर्याची किरणे सरळ रेषेत येत असतात. ज्याला आपण ऑक्टोबर हिट म्हणतो. आकाशातील ढगांचे आच्छादन कमी झालेले असते. त्यामुळे ही किरणे थेट जमिनीवर येतात. त्यात जमिनीमध्ये अजून भरपूर आर्द्रता असते. ऑक्टोबरमध्ये कमी जागेत उंच ढगांची निर्मिती होते. सूर्याच्या उष्णतेमुळे कम्युलस ढगांची निर्मिती होऊन दुपारनंतर असा जोरदार पाऊस पडतो, असे जीवनप्रकाश कुलकर्णी म्हणाले.

Web Title: Maharashtra Flood: Crisis will not stop, 15 more days of rain; Worrying news for farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app