शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा : 'सीसीटीएनएस' सर्चमध्ये देशात प्रथम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2020 20:15 IST

सीसीटीएनएस ही देशपातळीवर विकसित केलेली प्रणाली आहे

ठळक मुद्देनॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो यांच्या वतीने दिल्लीत ही ऑनलाईन कॉन्फरन्स आयोजित

पुणे : गुड प्रॅक्टिसेस इन सीसीटीएनएस/आयसीजेएसच्या कॉन्फरन्समध्ये सीसीटीएनएसला इम्लिमेंटेशन ऑफ आय.सी.जे.एस ॲन्ड सीसीटीएनएस सर्च या वर्गवारी देशभरातून महाराष्ट्राला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

पोलीस तपासामध्ये गुन्हे प्रकटीकरण, गुन्ह्यांचे पर्यवेक्षण, गुन्हे प्रतिबंध करणे या करता आय. सी. जे. एस व सीसीटीएनएस सर्च या प्रणालीची महत्वाची मदत होते. या प्रणालीच्या सहाय्याने महाराष्ट्र पोलिसांनी १५७३ गुन्हे उघडकीस आणले असून ७४३ चोरीला गेलेल्या मालमत्तेचा शोध, ६९३ हरवलेल्या व बेवारस मृत्युंचा शोध लावला. त्याचबरोबर ७ हजार ८८३ आरोपींवर प्रतिबंधात्मक कार्यवाही, ५०७ प्रकरणांमध्ये जामीन फेटाळले आहे. त्याचबरोबर १३ हजार ७२१ व्यक्तींची पडताळणी करण्यात आली असून त्यात ४ हजार ६०१ व्यक्तींविरुद्ध गुन्हे नोंद असल्याचे मिळून आले आहे. एकूण १ लाख १७ हजार २६ पारपार्ट व चारित्र्य पडताळणी प्रकरणामध्ये २ हजार ८३७ गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.

ही कामगिरी सीआयडीचे अपर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रविण साळुंके, उपमहानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक संभाजी कदम, अपर पोलीस अधीक्षक नंदा पाराजे, उपअधीक्षक जितेंद्र कदम, चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक प्रशांत पांडे, उपनिरीक्षक शशिकला काकरे, प्रमोद जाधव, पोलीस हवालदार जावेद खान, पोलीस कर्मचारी किरण कुलकर्णी, संदीप शिंदे, प्रियांका शितोळे, किर्ती लोखंडे यांनी केली.........

याबाबत राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे संगणक विभागातील पोलीस अधिक्षक संभाजी कदम यांनी सांगितले की, सीसीटीएनएस ही देशपातळीवर विकसित केलेली प्रणाली आहे. त्यात देशपातळीवरील गुन्हे व गुन्हेगारांची माहिती उपलब्ध आहे. एखाद्या आरोपी अथवा व्यक्तीची पडताळणी करायची असले तर त्या व्यक्तीविरुद्ध देशभरात कोठे, कोणता गुन्हा दाखल आहे का याची माहिती एका क्लिकवर मिळते. त्याद्वारे गुन्हे प्रकटीकरण, गुन्हेगारांच्या कार्यपद्धतीप्रमाणे शोध (एमओबी), शस्त्र परवाना, तसेच तपासामध्ये गुन्ह्यांची सध्यस्थिती याविषयीची माहितीची सुविधा या प्रणालीमध्ये अदययावत आहे.

गुन्हे प्रतिबंधक कारवाई करणे, पासपाेर्ट/ चारित्र्य पडताळणी, वाहनांबाबतची पोलीस रेकॉर्डवरील माहितीची पडताळणीची सर्व माहिती या प्रणालीवर उपलब्ध आहे. या प्रणालीचा देशभरात महाराष्ट्रातील पोलिसांनी गुन्हे तपासामध्ये सर्वाधिक वापर करुन गुन्हे उघड करण्यात यश मिळवले आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो यांच्या वतीने दिल्लीत ही ऑनलाईन कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस