महाराष्ट्र निवडणूक निकाल : मातोश्रीच्या अंगणात शिवसेनेला धक्का, विश्वनाथ महाडेश्वर पराभूत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 14:24 IST2019-10-24T14:24:32+5:302019-10-24T14:24:39+5:30
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपा आणि शिवसेना महायुतीला जबरदस्त धक्का बसला आहे.

महाराष्ट्र निवडणूक निकाल : मातोश्रीच्या अंगणात शिवसेनेला धक्का, विश्वनाथ महाडेश्वर पराभूत
मुंबई - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपा आणि शिवसेना महायुतीला जबरदस्त धक्का बसला आहे. एकीकडे राज्यात महायुतीची पिछेहाट होत असतानाच शिवसेना पक्षप्रमुखांचे निवासस्थान असलेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेनेला जबरदस्त धक्का बसला आहे. वांद्रे पूर्व मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर हे पराभूत झाले आहेत. वांद्रे पूर्व मतदारसंघातून काँग्रेसचे झिशान सिद्दिकी यांनी विजय मिळवला आहे.
वांद्रे पूर्व मतदारसंघातून शिवसेनेने महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी दिली होती. मात्र येथून तिकीट कापल्याने विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे महाडेश्वर यांना ही निवडणूक जड जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.
दरम्यान, आज झालेल्या मतमोजणीत शिवसेना उमेदवारा विश्वनाथ महाडेश्वर आणि शिवसेना बंडखोर तृप्ती सावंत यांच्यात झालेल्या मतविभागणीचा मोठा फटका महाडेश्वर यांना बसला.