शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
2
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
3
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
4
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
5
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
6
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
7
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
8
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
9
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
10
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
11
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
12
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
13
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळवारी केस कापल्याने आयुष्य ८ महिने कमी होते? पर्याय काय?
14
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल
15
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
16
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
17
CSK ‘खिडकी’तून बाहेर काढणार असल्याची चर्चा! त्यातच जड्डू Insta वरून ‘गायब’
18
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
19
५ स्टार सेफ्टी रेटिंग अन् तब्बल ७५००० डिस्काउंट असणारी कार ह्युंदाईने वेबसाईटवरूनच काढून टाकली! विक्रीही बंद होणार?
20
भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन

विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 17:05 IST

Maharashtra Election 2024 Result : विधान परिषदेतील 6 आमदार विधानसभेवर निवडून गेले आहेत, त्यामुळे त्यांची जागा रिक्त झाली आहे.

Maharashtra Election 2024 Result : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीला सर्वात मोठे यश मिळाले आहे. यानंतर आता राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून, लवकरच राज्यात नवीन सरकारचा शपथविधी होईल. दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर आता विधान परिषद निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. विधान परिषदेच्या 6 जागा रिक्त झाल्या असून, या जागांवर कोणाची वर्णी लागणार? हे पाहणे महत्वाचे आहे.

महायुतीचा 'महा'विजयविधानसभा निवडणुकीत महायुतीने 230+ जागांवर विजय मिळवत महाविकास आघाडीला चारीमुंड्या चीत केले. भाजपने 132, शिवसेना शिंदे गट 58 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने 41 जागांवर विजय मिळवला. तर महाविकासआघाडीला फक्त 47 जागा जिंकता आल्या. यात काँग्रेस 16 जागा, ठाकरे गट 20 जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गट 10 जागा मिळाल्या आहेत. तर अपक्ष-इतरांना 12 जागा मिळाल्या आहेत. 

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने अनेक दिग्गजांना मैदानात उतरवले होते. यात विधानपरिषदेवर आमदार असलेल्या काही नेत्यांचाही समावेश होता. या निवडणुकीत विधानपरिषदेवरील आमदारांचा विजय झाला आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या 6 जागा रिक्त झाल्या आहेत. आता या रिक्त जागांवर विधानसभेत डावललेल्या नाराजांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

कोणाच्या किती जागा रिक्त? विधानसभेच्या निकालानंतर विधानपरिषदेच्या एकूण सहा जागा रिक्त झाल्या आहेत. विधानपरिषदेतील भाजपचे 4 आमदार विधानसभेवर निवडून गेले आहेत. चंद्रशेखर बावनकुळे, गोपीचंद पडळकर, रमेश कराड आणि प्रविण दटके यांचा यात समावेश आहे. त्यामुळे विधानपरिषदेत भाजपच्या 4 जागा रिक्त झाल्या आहेत. तर, शिवसेनेकडून आमश्या पाडवी यांचीही विधानसभेवर निवड झाली आहे. त्यामुळे शिवसेनेची एक जागा विधानपरिषदेत रिक्त झाली आहे.

याशिवाय, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते राजेश विटेकर हेदेखील विधानपरिषदेवर आमदार आहेत. पण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते विजयी झाले आहेत. त्यामुळे त्यांची विधानपरिषदेची जागा रिक्त झाली आहे. यानुसार महायुतीच्या विधानपरिषदेच्या एकूण 6 जागा रिक्त झाल्या आहेत. आता या जागांवर कोणाला संधी मिळणार? याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MahayutiमहायुतीVidhan Parishadविधान परिषद