शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2024: काँग्रेस वर्चस्व कायम ठेवणार की, भाजप मुसंडी मारणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 11:39 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आणि भाजप अशीच थेट लढत आहे. भाजप-काँग्रेसच्या नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे.

राजेश भोजेकर, चंद्रपूर Maharashtra Election 2024: गेल्यावेळी बरोबरीत सुटलेला सामना आणि लोकसभा निवडणुकीतील विजयाच्या बळावर चंद्रपूर जिल्ह्यातील प्रभाव काँग्रेस कायम ठेवणार की, भाजप नव्या दमाने उफाळून येणार, हा विधानसभा निवडणुकीतील औत्सुक्याचा विषय आहे. भाजपचे सुधीर मुनगंटीवार, काँग्रेसचे विजय वडेट्टीवार व खासदार प्रतिभा धानोरकर या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यात कोण वरचढ ठरतो, हे निकालातूनच स्पष्ट होईल.

बह्मपुरी व चिमूरमध्ये थेट लढतीचे चित्र आहे. राजुऱ्यात स्पष्टपणे तिरंगी, तर चंद्रपूरमध्ये थेट लढतीत भाजप बंडखोरांची एन्ट्रीने आणि बल्लारपुरात काँग्रेस बंडखोरांमुळे लढतींना किंचित तिरंगी स्वरूप धारण केले आहे.

वरोरा विधानसभा निवडणूक

वरोरा मतदारसंघात काँग्रेस, भाजपसह अन्य तीन उमेदवारांमध्ये चढाओढ आहे. राजुऱ्यात काँग्रेस आमदार सुभाष धोटे, स्वभापचे अॅड. वामनराव चटप व भाजपचे देवराव भोंगळे यांच्यात लढत असून गोंगपाचे गजानन जुमनाके यांच्यामुळे लढतीत चुरस आली आहे.

बल्लारपुरात भाजपचे सुधीर मुनगंटीवार, काँग्रेसचे संतोषसिंह रावत यांच्या लढतीत डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी रंगत आणली आहे. 

चंद्रपुरात बंडखोर उमेदवारावर लक्ष

चंद्रपूरात भाजपचे किशोर जोरगेवार व काँग्रेसचे प्रवीण पडवेकर यांच्या लढतीत भाजपचे बंडखोर ब्रिजभूषण पाझारे यांच्याकडेही लक्ष आहे. 

वरोऱ्यात अपक्षांनी प्रमुख उमेदवारांचे गणित बिघडवले आहे. चिमूरमध्ये भाजपचे बंटी भांगडिया व काँग्रेसचे सतीश वारजूकर तर ब्रह्मपुरीत काँग्रेसचे विजय वडेट्टीवार व भाजपचे कृष्ष्णलाल सहारे यांच्यात सरळ लढत आहे.

उमेदवारांची कार्यकर्त्यांवरच भिस्त 

मतदानासाठी उरलेले दिवस मोजून प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार आता प्रचारात गुंतले आहे. सकाळी सात-आठ वाजेपासून पायाला भिंगरी लावल्यासारखे प्रचार करीत आहेत. एकाच टप्प्यात निवडणूका होत असल्यामुळे राज्यातील नेत्यांच्या सभाही कमीच आहे. यामध्ये उमेदवारांची अधिक भिस्त कार्यकर्त्यांवर आहे.

निवडणुकीत महत्त्वाचे फॅक्टर 

महायुतीकडून राज्यात अडीच वर्षाच्या काळातील विकासकामे जनतेला सांगत असून महाविकास आघाडीतील नेते विकासाला कसा विरोध करतात हे पटवून देण्याचा प्रयत्न करत आहे. महाविकास आघाडीकडूनमहायुतीचे सरकार कसे खोटारडे आहे हे पटवून देत आहे.

यासोबतच शेतकरी, रस्ते, वीज, पिण्याचे पाणी या प्रश्नांसह रोजगाराचे मुद्दे मांडत आहेत तसेच लाडकी बहीण योजनेबाबत दोन्ही कडून प्रचारात महत्वाचा मुद्दा मांडला जात आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४vidarbha regionविदर्भ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४chandrapur-acचंद्रपूरMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी