शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 06:27 IST

प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात उमेदवारांनी सर्व प्रकारच्या प्रचारावर लक्ष केंद्रित केले आहे. रविवारी सकाळपासून मतदारसंघातील विविध वॉर्डमध्ये उमेदवारांच्या प्रचार फेऱ्यांचा जल्लोष सुरू होता.

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा रविवार सर्वच उमेदवारांनी गाजवला. त्यामुळे दिवसा मतदारसंघांमध्ये प्रचार फेऱ्यांचा धूमधडाका आणि संध्याकाळी कार्यकर्त्यांद्वारे मतदारांच्या घरोघरी जाऊन वैयक्तिक प्रचार, असे चित्र सुटीच्या दिवशी पाहायला मिळाले. सुटीचा दिवस असल्याने जास्तीत जास्त मतदारांचे आपल्याकडे ‘लक्ष’ वेधण्यात उमेदवारांना यश आल्याचेही यावेळी पाहायला मिळाले.

प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात उमेदवारांनी सर्व प्रकारच्या प्रचारावर लक्ष केंद्रित केले आहे. रविवारी सकाळपासून मतदारसंघातील विविध वॉर्डमध्ये उमेदवारांच्या प्रचार फेऱ्यांचा जल्लोष सुरू होता. या माध्यमातून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असल्याने मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांना या फेऱ्यांमध्ये सामील करून घेण्यात आले होते. यामध्ये काही उमेदवार प्रचार फेरीसोबतच चाळी आणि झोपडपट्ट्यांच्या गल्ल्यांमध्ये फिरून मतदारांशी थेट संपर्क साधताना दिसले. तर काही गृहसंकुलांच्या चौकामध्ये आणि मैदानामध्ये उभे राहून इमारतींमधील सर्व रहिवाशांना मतदानाचे आवाहन करत होते. दुसऱ्या बाजूला दिवसभर प्रचार रथांच्या माध्यमातून ध्वनी चित्रफितींद्वारे मतदानाचे आवाहनही उमेदवारांकडून करण्यात आले.

दरम्यान, एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याने मतदारसंघातील समविचारी मतदारांना आम्ही यापूर्वीच भेटलो असून, अखेरच्या दोन दिवसांत सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सांगितले.

समाजनिहाय प्रचारावर भर 

प्रत्येक उमेदवारांकडून मतदारसंघांमध्ये मराठी भाषिक, उत्तर भारतीय, अल्पसंख्याक तसेच अनुसूचित जाती-जमातीच्या मतदारांना हेरून त्या-त्या समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी विविध विकासकामांसोबतच मंदिर आणि समाज मंदिरांच्या उभारणीचे आश्वासनही देण्यात येत आहे.

कार्यकर्त्यांची लगबग कोणत्याही परिस्थितीत मतदारांनी घराबाहेर पडावे आणि आपल्यालाच मतदान करावे, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा, अशा सूचना राजकीय पक्षांनी आणि उमेदवारांनी आपआपल्या बुथप्रमुखांना दिल्या आहेत. त्यानुसार हे कार्यकर्ते रविवारी दिवसा प्रचार फेरीत आणि संध्याकाळी मात्र आपापल्या बूथमधील मतदारांशी घरोघरी जाऊन थेट संपर्क साधताना दिसत होेते. मतदान किती महत्त्वाचे आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४mumbai regionमुंबई विधानसभा निवडणूकMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी