शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

"दादांनी थांबवलं तरी भाजपाविरोधात निवडणूक लढणार"; अजित पवार गटातील नेत्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 07:58 IST

जागावाटपाआधीच महायुतीतील घटक पक्षातील नेत्याने बंडखोरीचे दिलं संकेत, काहीही झालं तरी निवडणूक लढण्याचा इशारा

नागपूर - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती असो वा महाविकास आघाडीत जागावाटपाची चर्चा सुरू आहे. मात्र त्याआधीच अनेक इच्छुक मतदारसंघात निवडणूक लढायचीच असा चंग बांधून आहेत. त्यातच नागपूर पूर्व मतदारसंघ हा नेहमी भाजपासाठी अनुकूल मानला जातो. याठिकाणी महायुती आणि भाजपाला चांगली आघाडी मिळते. परंतु यंदा अजित पवारांच्या एन्ट्रीमुळे महायुतीला या जागेचा निर्णय अडचणीचा ठरणार आहे. 

नागपूर पूर्व मतदारसंघात राष्ट्रवादी नगरसेविका आणि नेत्या आभा पांडे या निवडणुकीसाठी सज्ज आहे. त्याबाबत तयारीही सुरू केली आहे. याबाबत आभा पांडे म्हणाल्या की, लोकशाही आणि राजकारणात जनता सर्वोतोपरी असते. जनतेच्या आग्रहास्तव मी निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. भाजपा दावा सोडेल किंवा नाही हा त्यांचा विषय मात्र मी मैदानात उतरणार आहे. नितीन गडकरींना या मतदारसंघात लीड मिळाली ती त्यांच्या व्यक्तिमत्व आणि कामाच्या पद्धतीमुळे मिळाली आहे. लोकसभेच्या निकालावरून विधानसभेचं गणित मांडता येत नाही. लोकांचा कौल कुणाच्या बाजूने आहे हे सगळ्यांना माहिती आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच जे मागील १५ वर्षापासून विकासाच्या बोंबा मारत आहेत. ३ टर्म आमदार आहेत मात्र ३ तासाच्या पावसात नागपूरात पाणी भरले. रस्त्यांची कामे पूर्ण नाहीत. अनियोजित विकासामुळे जनता त्रस्त झाली आहे. जनतेला नवा पर्याय हवा. त्यामुळे ते माझ्याकडे अपेक्षा ठेवत आहेत. महायुतीत ही जागा आमच्या वाट्याला आली नाही तरीही मी या मतदारसंघातून लढणार आहे. मी अजितदादांशी बोलली आहे. मागील ६ महिन्यापासून मी तयारी करतेय.  दादांनीही सांगितले तरी मी माघार घेणार नाही. माझी लढाई खूप पुढे गेली आहे असं स्पष्टपणे आभा पांडे यांनी अजित पवारांनाही सांगितले आहे.

दरम्यान, संपूर्ण नागपूरचा कचरा हा पूर्वमधील भांडेवाडीला येतो, आजपर्यंत यासाठी आमदारांनी काय केले. एकही प्रश्न तुम्ही भांडेवाडीबाबत विधानसभेत मांडले नाहीत हे तुमचे अपयश आहे. ३०० बेड हॉस्पिटल आणलं, स्मार्ट सिटी त्यात लोकांची घरे जातायेत. मी जर निवडून आले तर कुणाचेही घर पडू न देता विकासकामे करेन. माझी तयारी ग्राऊंड लेव्हलवर सुरू आहे. काहीही असो मी निवडणूक लढणार आहे असं सांगत राष्ट्रवादी नेत्या आभा पांडे यांनी विद्यमान भाजपा आमदार कृष्णा खोपडे यांच्याविरोधात रणशिंग फुंकलं आहे. 

टॅग्स :BJPभाजपाAjit Pawarअजित पवारKrishna Khupdeकृष्णा खोपडेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Mahayutiमहायुती