शहरं
Join us  
Trending Stories
1
२०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
2
आजचे राशीभविष्य १ जानेवारी २०२६ : नववर्षाचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी; वाचा १२ राशींचे सविस्तर भविष्य
3
'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
4
नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
5
टीव्ही-फ्रिजसह अनेक उपकरणांवर आजपासून ‘रेटिंग’ बंधनकारक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वीज, इंधनाची होणार बचत
6
मराठी भाषा ही मराठी माणसांनीच वाचवली पाहिजे! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती
7
मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 
8
सदानंद दाते राज्याचे नवे पोलिस महासंचालक, असा आहे आतापर्यंतचा कार्यकाळ
9
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
10
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
11
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
12
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
13
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
14
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
15
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
16
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
17
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
18
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
19
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
20
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : गडकिल्ल्यांवर लग्नसोहळे? उदयनराजेंनी दिले असे स्पष्टीकरण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 11:38 IST

शिवकालीन गडकिल्ले लग्नसोहळ्यांसारख्या समारंभांसाठी भाड्याने दिल्यास मिळणाऱ्या उत्पन्नातून अर्थव्यवस्था सुधारेल, असे वक्तव्य केल्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि भाजपा नेते उदयनराजे भोसले यांच्यावर जोरदार टीका होत आहे.

सातारा - शिवकालीन गडकिल्ले लग्नसोहळ्यांसारख्या समारंभांसाठी भाड्याने दिल्यास मिळणाऱ्या उत्पन्नातून अर्थव्यवस्था सुधारेल, असे वक्तव्य केल्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि भाजपा नेते उदयनराजे भोसले यांच्यावर जोरदार टीका होत आहे. दरम्यान, उदयनराजेंनी आता याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. प्रत्येक गडकिल्ल्यावर असलेल्या मंदिरात त्या परिसरात राहणारे लोक साध्या पद्धतीने विवाह सोहळे आयोजित करत असतात, त्यामुळे तेथे विवाहसोहळे आयोजित करण्यात काही गैर आहे, असे मला वाटत नाही. गडकिल्ल्यांवरील पर्यटन वाढले पाहिजे,''असे उदयनराजेंनी सांगितले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये उदयनराजेंनी गडकिल्ल्यांबाबत केलेल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की,''प्रत्येक गडकिल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांनी विशिष्ट्य उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून बांधला होता. आज काही किल्ल्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे. त्यासाठी गडकिल्ल्यांवरील पर्यटन वाढवले पाहिजे. रोप वेसारखे मार्ग निर्माण झाल्यास अधिकाधिक लोक गडकिल्ल्यांना भेट देतील.'' ''आता गडकिल्ल्यांवरील विवाह सोहळ्यांबाबत म्हणाल तर या गडकिल्ल्यांवर साधेपणाने विवाहसोहळे आयोजित होत असतात. गडकिल्ल्यांच्या परिसरात राहणारे लोक येथील मंदिरांमध्ये विवाह सोहळे आयोजित करतात. तसेच येथील मंदिरात दर्शन घेण्यासाठीही अनेकजण जातात. मात्र काल माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. बोलण्याला वेगळा अँगल दिला गेला. गडकिल्ल्यांवर पर्यटन वाढले पाहिजे. मात्र तिथे बार, रेस्टॉरंटसारख्या संस्कृतीला माझाच काय सर्वांचाच विरोध असले,''असे उदयन राजेंनी सांगितले.  छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेले ऐतिहासिक गडकिल्ले हॉटेल आणि लग्नसमारंभासाठी राज्य सरकार भाड्याने उपलब्ध करुन देण्याच्या धोरणावर सर्वत्र राज्यातून सरकारवर टीका करण्यात आली होती. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज व भाजपाचे नेते उदयनराजे भोसले यांनी सरकारच्या या धोरणाला पाठिंबा दिल्याचे वृत्त काल एका इंग्रजी वृत्तपत्रात प्रकाशित झाले होते. ''गडकिल्ले भाड्याने उपलब्ध करुन देण्याच्या धोरणावर माध्यमांनी चुकीचे वळण दिले आहे. मी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याशी या विषयावर चर्चा केली असून मला त्यांनी सरकारचे हे धोरण पूर्णपणे समजावून सांगितले. सरकारच्या धोरणात किल्ल्यांचा काही भाग लग्न समारंभास भाड्याने द्यावा, असे म्हटले आहे. त्यामुळे मला यामध्ये काहीही चुकीचे वाटत नाही. त्याचप्रमाणे आपण देवळात लग्न लावत नाही का? असा प्रश्न देखील उदयनराजेंनी उपस्थित केला आहे. पर्यटनावर देशाची अर्थव्यवस्था अवलंबून असते. त्यामुळे गडकिल्ले भाड्याने दिल्यास आपल्या देशाची अर्थव्यवस्था सुधारेल असां विश्वासही उदयनराजेंनी व्यक्त केला होता. Maharashtra Election 2019: कलम ३७० वर प्रश्न विचारणाऱ्यांनी देशात राहू नये; उदयनराजेंची राजे'शाही'

गडकिल्ले लग्न समारंभास भाड्याने दिल्यास अर्थव्यवस्था सुधारेल: उदयनराजे भोसलेगडकिल्ल्यांसंदर्भातील वक्तव्यानंतर उदयनराजे ट्रोलर्सच्या निशाण्यावर 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेsatara-pcसाताराShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज