गडकिल्ले लग्न समारंभास भाड्याने दिल्यास अर्थव्यवस्था सुधारेल: उदयनराजे भोसले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 01:30 PM2019-10-15T13:30:04+5:302019-10-15T13:30:08+5:30

छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेले ऐतिहासिक गडकिल्ले हॉटेल आणि लग्नसमारंभासाठी राज्य सरकार भाड्याने उपलब्ध करुन देण्याच्या धोरणावर सर्वत्र राज्यातून सरकारवर टीका करण्यात आली होती.

If Give To Rent Historic Forts Maharashtra Hotel And Wedding Then Economy Will Improve : Udayanraje Bhosale | गडकिल्ले लग्न समारंभास भाड्याने दिल्यास अर्थव्यवस्था सुधारेल: उदयनराजे भोसले

गडकिल्ले लग्न समारंभास भाड्याने दिल्यास अर्थव्यवस्था सुधारेल: उदयनराजे भोसले

googlenewsNext

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेले ऐतिहासिक गडकिल्ले हॉटेल आणि लग्नसमारंभासाठी राज्य सरकार भाड्याने उपलब्ध करुन देण्याच्या धोरणावर सर्वत्र राज्यातून सरकारवर टीका करण्यात आली होती. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज व भाजपाचे नेते उदयनराजे भोसले यांनी सरकारच्या या धोरणाला पाठिंबा दिला आहे. 

उदयनराजेंनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, गडकिल्ले भाड्याने उपलब्ध करुन देण्याच्या धोरणावर माध्यमांनी चुकीचे वळण दिले आहे. मी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याशी या विषयावर चर्चा केली असून मला त्यांनी सरकारचे हे धोरण पूर्णपणे समजावून सांगितले आहे. सरकारच्या धोरणात किल्ल्यांचा काही भाग लग्न समारंभास भाड्याने द्यावा असं म्हणटले आहे. त्यामुळे मला यामध्ये काहीही चुकीचे वाटत नाही. त्याचप्रमाणे आपण देवळात लग्न लावत नाही का? असा प्रश्न देखील उदयनराजेंनी उपस्थित केला आहे. पर्यटनावर देशाची अर्थव्यवस्था अवलंबून असते. त्यामुळे गडकिल्ले भाड्याने दिल्यास आपल्या देशाची अर्थव्यवस्था सुधारेल असां विश्वासही उदयनराजेंनी व्यक्त केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेले ऐतिहासिक गडकिल्ले हॉटेल आणि लग्नसमारंभासाठी राज्य सरकार भाड्याने उपलब्ध करून देणार आहे. हेरिटेज टुरिझमला चालना देण्यासाठी एमटीडीसीने राज्यातील 25 किल्ल्यांची निवड केली आहे. त्यामुळे हे किल्ले 50 ते 60 वर्ष भाडेतत्वावर भाड्याने देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती समोर आल्यानंतर विरोधकांनी राज्य सरकावर मोठ्या प्रमाणात टीका केली होती.

 छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणारे किल्ले सोडून, इतर किल्ल्यांच्या विकासाचे राज्य सरकारचे धोरण आहे. पुरातत्व विभागाकडे असलेले किल्ले वगळता, राज्यात अनेक गड, किल्ले दुर्लक्षित आहेत. या किल्ल्यांचे जतन व्हावे यासाठी यासाठी गुंतवणूकदारांची मते आजमावली जातील. त्यानंतरच धोरण ठरविले जाईल. मात्र, हे किल्ले देखील लग्नासाठी भाड्याने दिले जाणार नाहीत, अशी स्पष्टोक्ती पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी पत्रकार परिषदेत दिली होती.

Web Title: If Give To Rent Historic Forts Maharashtra Hotel And Wedding Then Economy Will Improve : Udayanraje Bhosale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.