Maharashtra Election 2019 videos of voting goes viral in pune | महाराष्ट्र निवडणूक २०१९: पुण्यात मतदान LIVE! व्हिडीओ व्हायरल; मतदान केंद्रावरील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्र निवडणूक २०१९: पुण्यात मतदान LIVE! व्हिडीओ व्हायरल; मतदान केंद्रावरील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

पुणे: पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील टिंगरे आणि पिंपरी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अण्णा बनसोडे यांना मतदान केल्याचे सध्या व्हिडीओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होतोय. मतदान केंद्रावरील सुरक्षा व्यवस्थेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले. 

मतदान करतानाचे व्हिडिओ व्हायरल होऊ नयेत यासाठी निवडणूक आयोगाने यापूर्वीच वेगवेगळ्या उपाययोजना केल्या आहेत. मतदान करताना मोबाईल जवळ बाळगण्यासदेखील बंदी घातली आहे. परंतु असे असूनही काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी मोबाईलमध्ये आपण मतदान करतानाचे हे व्हिडिओ शूट करून ते सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. 

अनेक मतदान केंद्रांवर पोलिसांनीही मोबाईल बंदी घातली आहे. परंतु काही अति उत्साही कार्यकर्ते पोलिसांची नजर चुकवून मोबाईल मतदान केंद्राच्या आत घेऊन जात आहेत. यातून या मोबाईल बंदीचा फारसा फायदा झाला नसल्याचे चित्र काही ठिकाणी दिसून येत आहे.


Web Title: Maharashtra Election 2019 videos of voting goes viral in pune
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.