शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019: राज्यात नक्कीच आश्चर्यकारक निकाल लागतील; शरद पवारांचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 13:06 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ - अटलबिहारी वाजपेयींच्या काळात मेगाभरती वैगेरे असं नव्हतं. तेव्हा विचारधारेने पक्ष चालत होता

मुंबई - विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक आहेत. यंदाच्या निवडणुकांचे निकाल आश्चर्यकारक असतील. लोकांचा प्रतिसाद पाहता हे घडू शकतं असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. एका मराठी माध्यमाशी बोलताना त्यांनी यावर भाष्य केलं आहे. 

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, गेले काही वर्षात माझ्या पक्षात बऱ्याच घडामोडी घडल्या, सत्तेच्या काळात असणारे नेते सत्ता नसताना सोडून गेले, सत्तेशिवाय न राहण्याची स्थिती आल्यामुळे नेत्यांच्या मनात चलबिचल झाली. असे नेते सत्ताधारी पक्षात गेले. पक्षांतर केलेल्यांपैकी काही ५-१० नेते सोडले तर इतरांना संधी मिळाली नाही. या नेत्यांचा वापर करुन घेतला. एखादी व्यक्ती ४-५ आमदारांना निवडून आणणार असतील तर त्याला किंमत दिली जाते. नंतर हळूहळू त्यांना बाजूला सारुन दिलं जातं असं त्यांनी सांगितले. 

तसेच अटलबिहारी वाजपेयींच्या काळात मेगाभरती वैगेरे असं नव्हतं. तेव्हा विचारधारेने पक्ष चालत होता, आज स्थिती तशी नाही, येतंय त्याला घ्या अशी स्थिती आहे. जे येत नसतील त्यांना सत्तेचा गैरवापर करुन पक्षात घेतलं जातं असा आरोप शरद पवारांनी केला आहे. दरम्यान, काँग्रेसने कलम ३७० ला विरोध केला नाही तर स्थानिक जनतेला, नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा अशी भूमिका मांडली. मात्र ती मागणी करण्याची भूमिका घेतली म्हणून डुब मरो असं पंतप्रधान बोलतात हे योग्य नाही, देशाच्या पंतप्रधनांना १० सभा घ्याव्या लागतात, गृहमंत्री अनेक जिल्ह्यात सभा घेत फिरतायेत मग विरोधक कसे दिसत नाहीत? असा सवाल पवारांनी उपस्थित केला. 

त्याचसोबत २०१४ च्या निवडणुकीत मी उभा होतो का? मी १४ वेळेला लोकसभा, राज्यसभा निवडणुका लढविल्यानंतर मी निर्णय घेतला निवडणुकीत उभं राहायचं नाही. तरुणांना संधी देण्याची भूमिका घ्यायला हवी. राज्य सहकारी बँकेतील कर्ज देण्यासाठी मी शिफारस पत्र लिहिले आहे, पत्र दिलं आहे. मग ते दाखवा असंही आवाहन शरद पवारांनी केलं आहे. 

वीर सावरकरांना भारतरत्न देण्यात गैर नाही  वीर सावरकरांच्या हिंदुत्ववादी विचाराला विरोध आहे मात्र त्यांनी विज्ञानवादी विचारांना चालना दिली. त्याबद्दल त्यांना भारतरत्न देणं काय गैर वाटत नाही. त्यांनी विज्ञानवादी विचार लोकांमध्ये मांडले. वीर सावरकरांचे नेतृत्व भाजपाने कधी मानलं नव्हते. जनसंघ असो वा भाजपा स्थापनेपासून इतिहास आठवलो, तर सावरकरांच्या हिंदू महासभेला जनसंघाचा पाठिंबा नव्हता. आज ते भूमिका मांडत आहेत. पक्ष वाढविण्यासाठी ज्याचा ज्याचा वापर करता येईल ते सगळं भाजपा करत आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Sharad Pawarशरद पवारBJPभाजपाAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयी