शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
11
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
12
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
13
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
14
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
15
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
16
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
17
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
18
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
19
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
20
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन

Maharashtra Election 2019: ...तेव्हा लोकांना समसमान वाटपाचा अर्थ कळेल; उद्धव यांचा भाजपावर 'राम'बाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 09:47 IST

राम मंदिराचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंनी भाजपाला 'त्या' वचनाची आठवण करुन दिली

मुंबई: लोकसभा निवडणुकीवेळी भाजपा अध्यक्ष अमित शहा मुंबईत आले होते. त्यावेळी दोन्ही पक्ष विधानसभा निवडणुकीत निम्म्या निम्म्या जागा लढतील, असा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला होता. मात्र प्रत्यक्षात विधानसभा निवडणुकीत शिवसेना १२४ जागा लढवणार आहे. त्यामुळे युतीतला मोठा भाऊ कोण हे स्पष्ट झालं आहे. यावर भाष्य करताना मंत्रिमंडळ स्थापन होईल, तेव्हा लोकांना समसमान वाटप म्हणजे काय ते कळेल, असं सूचक विधान उद्धव यांनी केलं. Maharashtra Election 2019: ...तोपर्यंत राजकारण सोडणार नाही; उद्धव ठाकरेंची प्रतिज्ञा फिफ्टी फिफ्टीचा करार मोडला असं तुम्हाला वाटत का, असा प्रश्न उद्धव यांना सामनाचे संपादक संजय राऊत यांनी मुलाखतीत विचारला. त्यावेळी उद्धव यांनी भाजपा अध्यक्ष अमित शहांसोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेचा उल्लेख केला. 'आम्ही जागावाटपात समजूतदारपणा दाखवला. अमित शहांसोबत हॉटेल ब्ल्यू सीच्या पत्रकार परिषदेत जबाबदारी आणि अधिकार यांचं समसमान वाटप हा अतिशय महत्त्वाचा भाग होता. त्यामुळे २४ तारखेला विधानसभेचे निकाल लागतील. त्यानंतरच्या पुढच्या आठ-दहा दिवसात मंत्रिमंडळ स्थापन होईल. तेव्हा समसमान वाटप म्हणजे काय हे लोकांना कळेल,' असं उद्धव ठाकरे म्हणाले. Maharashtra Election 2019: उद्धव ठाकरे म्हणतात, 124 जागांवर समाधान मानणे ही तडजोड नाहीच, तर...    लोकसभेवेळी फिफ्टी फिफ्टीचा फॉर्म्युला देणाऱ्या भाजपानं शब्द पाळला नाही, अशी शिवसैनिकांची भावना आहे. त्यावर बोलताना उद्धव यांनी भाजपाला रामाची आठवण करुन दिली. 'मंत्रीमंडळ स्थापनेवेळी जबाबदारी आणि अधिकारांचं समसमान वाटप होईल यावर माझा विश्वास आहे. कारण शेवटी अयोध्येत राममंदिर आम्हाला कशाला पाहिजे? रामाचंच मंदिर का पाहिजे? राम हा सत्यवचनी होता. एकवचनी होता. वचन पाळण्याची आपली नीती किंवा वृत्ती नसेल तर राममंदिर पोकळ आहे. मग ती एक वल्गना आहे. त्यामुळे आम्ही रामभक्त आहोत. आम्ही हिंदुत्ववादी आहोत. दिलेला शब्द पाळणारे आम्ही रामाचे भक्त आहोत. त्यामुळे मला विश्वास आहे,' अशा शब्दांमध्ये उद्धव यांनी अप्रत्यक्षपणे भाजपाला दिलेल्या वचनाची आठवण करुन दिली. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाAmit Shahअमित शहा