शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

Maharashtra Election 2019 : ऊसतोड कामगाराचा मुलगा भाजपाकडून विधानसभेचा उमेदवार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2019 10:17 AM

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. त्यात, मोहिते पाटील यांचं वर्चस्व असलेल्या माळशिरस मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांनीही रंगत वाढवली आहे

माळशिरसचे माजी आमदार दिवंगत हनुमंत डोळस यांच्या प्रेरणादायी कथा सर्वांनाच परिचित आहे. हॉटेलात काम करणाऱ्या मुलगा ते विधानसभा सदस्य असा डोळस यांचा प्रवास राहिला होता. त्यानंतर, डोळस यांच्याच मतदारसंघातून आता पुन्हा एकदा सर्वसामान्य कुटुंबातील युवकाला उमेदवारी देण्यात आली आहे. अगदी शेवटच्या टप्प्यात भाजपा पक्षश्रेष्ठी आणि मुख्यमंत्र्यांकडून राम सातपुते या तरुणाचं नाव पुढे आहे. विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वात राम यांना माळशिरस मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरण्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर राम सातपुते यांनीही मोहिते पाटील कुटुंबीयांचा आशीर्वाद घेऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. 

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. त्यात, मोहिते पाटील यांचं वर्चस्व असलेल्या माळशिरस मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांनीही रंगत वाढवली आहे. राम सातपुते यांना राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर यांचं आव्हान आहे. मात्र, राम सातपुतेंचं नाव समोर येताच जिल्ह्यात एकच चर्चा रंगली. राम सातपुते कोण? त्यांची पार्श्वभूमी काय? असा प्रश्न अनेकांना पडला होता. बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील धामणगाव-बीड रस्त्यावर डोईठाण नावाच्या गावतील ऊसतोड कामगाराचा हा मुलगा आहे. कुटुंब माळशिरस तालुक्यातील भांबुर्डी या दुष्काळी गावातील रहिवाशी. शंकर सहकारी साखर कारखान्याकडे विठ्ठल सातपुते हे 1990 ते 1995 पासून ऊसतोडणीचे काम करत होते. आपल्या मुलावर ही वेळ येऊ नये म्हणून विठ्ठल यांनी राम यांना शिक्षणासाठी पुण्याला पाठवले. 

राम यांनी पुण्यातील विद्यार्थीगृहात मुद्रण तंत्र पदविका आणि त्यानंतर पदवीचे शिक्षण राम यांनी पूर्ण केले. याच दरम्यान, अभाविपशी राम यांचा संपर्क जोडला गेला. त्यानंतर, राम यांनी विद्यार्थी चळवळीचे नेतृत्व हाती घेतले. प्रशासनावर धाक दाखवून विद्यार्थी आणि युवकांचे प्रश्न राम यांनी हिरिरीने मांडले. याची दखल घेतच, भाजपाने युवा मोर्चाचे अध्यक्षपद राम यांच्याकडे दिले. भीमा-कोरेगाव प्रकरणानंतर शहरी नक्षलवाद हा विषय राम यांनी विविध प्रांतांमध्ये जाऊन प्रभावीपणे मांडला. तसेच, मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून अनेक गरजुंना पैशांची सरकारी मदत मिळवून दिली. विशेष म्हणजे आजही रामचे वडिल आजही त्यांच्या गावी चपला शिवायचे दुकान चालवतात. तर, रामने माळशिरस येथील आपल्या गावी शेतीचं काम करायचं ठरवलंय. आपला मुलगा आमदार होणारंय, याबाबत त्यांच्या आईला अद्यापही कळत नाही. आमदाराने काय काम करायचं असतं हे मला माहित नाही. पण, लोक रामचं कौतुक करतात म्हणजे नक्कीच मोठं काम करणार असेल,असे त्याच्या आई जिजाबाई सातपुते यांनी म्हटलंय. तसेच, राजकारणात जाण्याचा निर्णय रामने घेतला, तेव्हाही आम्ही त्याला विरोध केला नसल्याचं जिजाबाई सांगतात. माळशिरस मतदारसंघात भाजपाने राम सातपुते या तरुण चेहऱ्याला संधी दिल्याने राष्ट्रवादीच्या उत्तम जानकरांसमोर तगडे आव्हान निर्माण झाले आहे. 

दरम्यान, मोहिते पाटील यांनी आजपर्यंत अनेक सामान्य कार्यकर्त्यांमधून नेते घडवले आहेत. राम सातपुतेंच्या नावाने पाटील कुटुंबीयांची ही परंपरा पुढेही चालत राहिली आहे. 

टॅग्स :malshiras-acमाळशिरसVijaysingh Mohite-Patilविजयसिंह मोहिते-पाटीलPuneपुणेMumbaiमुंबईAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019