शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019: मुंडेसाहेबांनी मला 'या' 3 गोष्टी शिकवल्या, पंकजा मुंडेंनी सांगितलं राजकीय यशाचं गमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 14:39 IST

Maharashtra Election 2019: बीड जिल्ह्यात पंकजा यांनी जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रचारासाठी सभा घेतली.

भाजपा नेत्या आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडें यांनी बीड जिल्ह्यात शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. या सभेला संबोधित करताना, पंकजा यांनी केलेल्या विकासकामाची माहिती दिली. तसेच, बीड जिल्ह्यात पाऊस कमी पडला, पण मी निधीचा पाऊस आणलाय. पुढील मंत्रिमंडळातही मी असणार आहे, या जिल्ह्याचं पालकत्व मी स्विकारणारंय, असे म्हणत पुन्हा एकदा आपणच पालकमंत्री होणार असल्याचं पंकजा यांनी म्हटले.  

भाजपात मोठ्या प्रमाणात मेगा भरती झाली आहे. मात्र, या मेगा भरतीचा नारळही बीडमध्येच फुटला. सुरेश धस यांच्यापासूनच ही सुरुवात झाल्याचं पंकजा यांनी सांगितलं. मेगा भरतीची आता मेगा गळती सुरू झाली आहे, असे म्हणत राष्ट्रवादी-काँग्रेसवर टीका केली. तसेच, राजकारण करताना, माझ्या वडिलांनी, मुंडेसाहेबांनी मला राजकारणात तीन गोष्टी शिकवल्या. त्या कानमंत्राला सोबत घेऊनच मी राजकारण करते. राजकारणात कधीही कोणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. राजकारण नेहमी बेरजेचं करायचं आणि सर्वात महत्त्वाची तिसरी गोष्ट म्हणजे, स्वत: जिथून निवडणूक लढवत आहोत, त्याबद्दल स्वत:ला कधीही असुरक्षित वाटून घ्यायचं नाही. या तीन गोष्टींची मी मनाला गाठ बांधून इथपर्यंत पोहोचले आहे. ज्यांनी माझ्या जन्मापासून निवडणुका लढवल्या त्या सुरेश धसांना सांभाळणं सोप्पयं का, पण मी तेही करतेय. कदाचित मला ते जमतंय असं सुरेश धस दाखवण्याचा प्रयत्न करतील, असे पंकजा यांनी म्हटले. त्यानंतर उपस्थित जनसमुदायात हशा पिकला. 

बीड जिल्ह्यात पंकजा यांनी जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. या सभेत शिवसेना आणि भाजपा महायुतीच्या उमेदवारांना निवडूण देण्याचं आवाहन केलं. तसेच, जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रीपद मिळावं, यासाठी मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याचंही पंकजा यांनी सांगितल.  

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेBeedबीडbeed-acबीडBJPभाजपाAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019