शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक 2019: संभाव्य आघाडीविरोधात ऑनलाइन याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2019 06:18 IST

महायुतीला मतदान केलेल्या मतदारांचा विश्वासघात झाल्याचा दावा

मुंबई : महाराष्ट्र शिवसेनाकाँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन करण्याचे प्रयत्न करत आहे. त्यामुळे भाजप व शिवसेनेच्या युतीला मतदान केलेल्या मतदारांची फसवणूक शिवसेनेकडून होत असल्याचा आरोप करत काही मतदारांनी याबाबत ऑनलाइन याचिका दाखल केली आहे. चेंजडॉटओआरजी यावर ही याचिका दाखल करण्यात आली असून राज्यपालांना मेलद्वारे याबाबत माहिती देण्यात आल्याची माहिती याचिकाकर्ते किशोर चितळे यांनी दिली आहे.शिवसेना व भाजपमध्ये मुख्यमंत्री पदावरुन वाद उफळल्याने राज्यात महायुतीला बहुमत मिळूनही त्यांचे सरकार मात्र स्थापन होऊ शकले नाही. भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यपालांनी सत्तास्थापनेचे निमंत्रण देऊनही यापैकी कोणताही पक्ष सत्ता स्थापन करु शकला नाही. परिणामी राज्यपालांनी राज्यात राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली व सध्या राज्यात राष्ट्रपती राजवट सुरु आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामुळे भाजप व शिवसेनेच्या युतीला मतदान केलेल्या मतदारांची फसवणूक झाल्याची भावना काही मतदारांमध्ये झाली असून त्यांनी याविरोधात जनजागृती करण्यासाठी ऑनलाइन याचिका दाखल केली असून त्याला सुमारे चार हजारपेक्षा अधिक जणांनी स्वाक्षरी करुन पाठिंबा दिला आहे. तसेच नवी आघाडी करण्याऐवजी या पक्षांनी निवडणुकीच्या माध्यमातून मतदारांना पुन्हा सामोरे जावे अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. राज्यपालांनी या अनैसर्गिक आघाडीला सत्ता स्थापन करण्याची संधी देऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस