शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक 2019: 'कुणीही उचलून न्यायला आमदार म्हणजे काय मंडईतली भाजी आहे का?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 16:07 IST

आमदारांची फोडाफोड करण्याचे प्रयत्न होत असल्याचे आरोप

मुंबई: सर्वात मोठ्या पक्षाकडून आमदारांच्या फोडाफोडीचे प्रयत्न होत असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार रंगशारदा हॉटेलमध्ये एकत्र आले आहेत. तत्पूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर ठाम असल्याचं म्हणत लोकसभा निवडणुकीच्यावेळी दिलेला शब्द पाळण्याचं आवाहन भाजपाला केलं. या बैठकीनंतर शिवसेनेचे आमदार रंगशारदा हॉटेलसाठी रवाना झाले.मातोश्रीवरील बैठकीनंतर निघालेल्या आमदारांनी पक्षप्रमुख घेतील, त्या निर्णयामागे ठाम असल्याचं म्हणत शिवसेना मागण्यांवरून मागे हटणार नसल्याचं सांगितलं. यावेळी शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतली. 'शिवसेनेचा एकही आमदार फुटू शकत नाही. ज्याला हिंमत करायची आहे, त्यानं ती करून पाहावी. कोणीही उचलून न्यायला आमदार म्हणजे काय मंडईतील भाजी आहेत का?,' असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला. शिवसेनेचा आमदार फोडूनच दाखवा, असं थेट आव्हान त्यांनी दिलं. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता सर्व आमदारांनी एकत्र राहायला हवं. त्यामुळे शिवसेनेचे आमदार रंगशारदा हॉटेलमध्ये जात असल्याची माहिती आमदार सुनील प्रभू यांनी दिली. शिवसेना पक्षप्रमुखांच्या निर्णयामागे सर्व आमदार ठामपणे उभे राहतील, असंदेखील ते म्हणाले. तर आमदार फोडायचा प्रयत्न शिवसेना स्टाईलनं प्रत्युत्तर देण्यात येईल, असा इशारा उदय सामंत यांनी दिला. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाSanjay Rautसंजय राऊत